IPO Update: एसआरएम कॉन्ट्रॅक्टरचा आयपीओ २६ तारखेला उघडणार

प्राईज बँड २०० ते २१० प्रति शेअर निश्चित ग्रे मार्केटमध्ये ३० रूपये प्रिमियम दराने मिळण्याची शक्यता

    22-Mar-2024
Total Views |

IPO
 
मुंबई: एसआरएम कॉन्ट्रॅक्टर (SRM Contractor) आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. २६ ते २८ मार्चपर्यंत आयपीओचे बिडींग खुले राहणार आहे. या आयपीओची प्राईज बँड प्रति समभाग (शेअर) २०० ते २१० प्रति समभाग असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या आयपीओत कमीत कमी ७० समभाग खरेदी करावे लागतील. एकूण ६२ लाख मूल्यांकन असलेले समभाग गुंतवणूकदारांसाठी वितरित केले जाणार आहेत ही प्राथमिक माहिती प्रसारमाध्यमांनी निश्चित केलेली आहे.
 
काश्मीरस्थित एसआरएम कॉन्ट्रॅक्टर कंपनी बांधकाम क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे.इंजिनिअरिंग प्रोकरमेंट, कन्स्ट्रक्शन अशा विविध प्रकारच्या सेवा कंपनीतर्फे पुरवठ्यात येतात. याशिवाय ब्रीज, टनेल अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चर (मुलभूत सुविधा) अशा विविध प्रकल्पांची कंत्राट कंपनीकडून घेण्यात येतात. २००८ मध्ये ही कंपनी स्थापन झालेली होती.
 
अधिकृत माहितीनुसार किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी १४७०० रूपयांची आयपीओ गुंतवणूक गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे. SRM Contractor कंपनीचे बीएससी (BSE) व एनएससीवर (NSE) वर लिस्टिंग होणार आहे.
 
एकूण ९८० समभाग खरेदी करावे लागतील.महत्वाच्या व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांना कमीत कमी १४ गठ्ठे (Lot) समभाग खरेदी करावे लागतील. व्यवसायिक विना संस्थात्मक गुंतवणूकदारांना ज्ञि ६९ गठ्ठ्यात समभाग खरेदी करण्याची अट कंपनीकडून ठेवण्यात आली आहे. व्यवसाय संस्थात्मक गुंतवणूकदारांना ही अट ६९ गठ्ठ्यात खरेदी करण्याची ठेवलेली आहे.
 
इंटरॅक्टिव्ह फायनांशियल सर्विसेस या कंपनीकडून सदर आयपीओचे बूक रनिंग लीड (Book Running Lead) सांभाळले जाईल तर ,बिगशेअर सर्विसेसकडून हा आयपीओ नोंदणीकृत होणार आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये ३० रूपयांचा प्रिमियम भाव या समभागावर अपेक्षित केला गेला आहे. १ एप्रिलला या शेअर्सचे वाटप होणार असून अपात्र बिडींगला त्यांची रक्कम परतावा २ एप्रिलपर्यंत परत मिळेल. ३ एप्रिलपर्यंत हा समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे.
 
कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून आलेल्या निधीचा वापर वेगवेगळ्या औद्योगिक कारणांसाठी केला जाईल. ज्यामध्ये यंत्रखरेदी, थकित देये चुकवण्यासाठी, वर्किंग कँपिटल गरजेसाठी व भविष्यातील गुंतवणूक तरतूदीसाठी व दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे.