अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईत ८५०० चार्जर उभारणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार सगळी माहिती एका मोबाईल क्लिकवर

    22-Mar-2024
Total Views |

Adani

मुंबई:अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने मुंबईत ८५०० चार्जर सुरू करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) चार्जिंगसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी प्रयत्नशील आहे.गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कारला भारत सरकाने चालना दिली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी सरकारने कंपन्यांना सबसिडीदेखील दिली होती. परंतु अपुरे चार्जिंग सुविधा हा कळीचा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढाकार घेत ८५०० चार्जिंग बांधण्याचे ठरवले आहे.
 
शेअर चार्ज" उपक्रम, ज्या अंतर्गत एकाधिक वाहन मालक समान चार्जिंग पायाभूत सुविधा वापरू शकतात असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. यानुसार वाहनांचे मालक चार्जिंगची वेळ, जागा, मॉनिटरिंग, व भरायचे पैसे हे सगळे एका मोबाईल क्लिकवर करू शकतात. यासाठी अँपची निर्मिती कंपनी करणार आहे.
 
४००० हाउसिंग सोसायटीमध्ये एकूण ८५०० चार्जिंग सुरू करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामाहिती आधारे चारचाकी चार्जिंगसाठी सात तास लागू शकतात तर दुचाकीसाठी चार तास लागू शकतात.