US Federal Reserve Rate Latest -
मुंबई: फेडरल रिझर्व्ह बँकेच्या सदस्यांनी घेतलेल्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह दर हा ' जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारात गुंतवणूकदारांमध्ये दराबाबत अनिश्चितता कायम होती. परंतु धोरणकर्ते मंडळीनी दरात कुठलीही कपात केलेली नाही. युएस मध्यवर्ती बँकेच्या अपेक्षित प्रगती दर कायम राहूनही बँकेने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये महागाई दरात २ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची बँकेची आशा आहे.
फेडरल बँकेच्या नव्या धोरणानुसार महागाई वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अन्न व उर्जा वगळता बाकी गोष्टींमध्ये वैयक्तिक खर्च निर्देशांकात (Personal Consumption Expenditure) २.६ टक्क्याने वाढ वर्षाच्या अखेरीस होऊ शकते असे या धोरणात नमूद केले आहे.मागील डिसेंबर महिन्यात हा खर्चाचा दर २.४ टक्के इतका राहिला आहे.
१९ सदस्यीय समितीत १० सदस्यांचे मत महागाई दर वाढेल असे बैठकीत नोंदवले गेले आहे.युएस डॉलरची किंमत घसरली असताना फेडरल ओपन मार्केट कमिटीने घेतलेल्या निर्णयानंतर युएस शेअर बाजारात उसळी पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डिसेंबर मधील १.४ विकासदरात वाढ होत दराची पातळी २.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. मागील डिसेंबरमध्ये अमेरिकेतील बेरोजगारी दर ४ टक्के इतका होता. फेब्रुवारीत बेरोजगारी दरात घट होऊन ३.९ टक्के इतका नोंदवला गेला होता.