पॉकेट एफएमने सिरिज डी फेरीतून १०३ दशलक्ष डॉलर्स जमवले

सीरिज डी फंडिगमधून १०३ दशलक्ष डॉलर्स निधीचा संग्रह

    21-Mar-2024
Total Views |

Pocket FM
 
मुंबई: भारतातील स्टार्टअप महाकुंभला चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पॉकेट एफएमने सिरिज डी फंडिगमधून १०३ दशलक्ष डॉलर्स इतक्या निधीचा संग्रह केला आहे. लाईटस्पीडने घेतलेल्या फंड रेजिंग (Fund Raising) फेरीत पॉकेट एफएमने हा निधी जमवला आहे.दर्जेदार कंटेंट व कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी या निधीचा उपयोग केला जाईल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
 
आतापर्यंत पॉकेट एफएमने १९६.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी जमा केला आहे. कंपनीच्या अमेरिकेसोबत युरोपीय बाजारातील व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी केला जाणार आहे. याशिवाय कंटेंट लायब्ररीतील संख्या वाढवण्यासाठी तसेच मजबूत आयपी प्लेबूक तयार केला जाईल.
 
पॉकेट एफएमने २०१८ साली कंपनी स्थापन झाल्यापासून १ लाख तासांहून अधिक कंटेंट (Content) ची निर्मिती केली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या स्थितीत गेल्या वर्षी ५७ टक्क्याने वाढ झाली आहे. २०२३ मध्ये कंपनीने २० दशलक्षहून अधिक आर्थिक व्यवहार केल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले होते. आर्थिक वर्ष २०२२ मधील चौथ्या तिमाहीत (Q4) मध्ये १०० मिलियन डॉलर निधीचा टप्पा पार केला होता.
 
या निधी संकलनाबाबत प्रतिक्रिया देताना,'ऑडिओ फिक्शनच्या वाढत्या मागणीमुळे आम्ही मनोरंजन उद्योगातील एक अनपेक्षित जागा ओळखली आणि प्रत्येक महत्त्वाच्या बाजारपेठेतील या संधीला सामोरे जाण्यासाठी आम्ही प्लेबुक तयार केले.ऑडिओ मालिकेची आमची सामग्री लायब्ररी आणि प्लॅटफॉर्मवरील मजबूत उपभोग वर्तन मनोरंजनाच्या भविष्याला आकार देत आहे. या उदयोन्मुख श्रेणीतील आमचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी आणि एक मजबूत IP प्लेबुक तयार करण्यासाठी अनन्य आणि अनन्य कथांवर आमचे काम चालू आहे. हा निधी आमचा दृष्टीकोन आणि उद्योगात व्यत्यय आणण्यासाठी आम्ही आणलेल्या शक्यतांची पुष्टी करतो,” असे पॉकेट एफएमचे सीईओ आणि सह-संस्थापक रोहन नायक म्हणाले आहेत.