नवी दिल्ली : झारखंडमधील दुमका येथे १६ वर्षीय पीडितेवर पेट्रोल ओतून पेटवणाऱ्या शाहरुखला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तरी त्यांना दि. २८ मार्च २०२४ रोजाी शिक्षा सुनावली जाईल. या प्रकरणात शाहरुखसोबतच त्याचा मित्र नईमलाही दोषी ठरवण्यात आले आहे. नईमनेच शाहरुखला आणले आणि त्याला पेट्रोल दिले जे नंतर पीडितेच्या अंगावर ओतून तिला जाळण्यासाठी वापरले गेले. दरम्यान शाहरुखवर पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एसपींच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय एसआयटीने या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर या प्रकरणी ११२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि नंतर आरोप निश्चित करून साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर १९ मार्च २०२४ रोजी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आणि अखेर शाहरुख-नईम दोषी ठरले. त्याची कोर्टात हजेरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत होती, पण शिक्षेच्या भीतीने त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असल्याचे अहवाल सांगत आहेत.
नेमंक प्रकरण काय?
झारखंडमधील दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी पीडित मुलीवर हल्ला झाला.गंभीर अवस्थेत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची सर्व माहिती मुलीने स्वतः पोलिसांना दिली होती. यावेळी पीडितेने आपल्यासोबत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खुलासाही केला. तिने सांगितले होते की, शेजारी राहणारा शाहरुख तिला रोज त्रास देत असे. तिला मैत्रीसाठी विचारायचा. मात्र पीडितेने मैत्री करण्यास नकार दिला.
हल्ल्याच्या एक दिवस आधी मुलीने शाहरुखबद्दल तिच्या वडिलांकडे तक्रारही केली होती. यानंतर ती झोपायला गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठला तेव्हा त्याच्या पाठीत जळजळ होत होती. शाहरुखने खिडकीतून पीडितेवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडितेने आरडाओरड सुरु केली. पण आगीची दाहकता लक्षात घेता, अथक प्रयत्नांनी आगीवर नियत्रंण मिळवता आले. तिला रुग्णालयात नेले असता ती ९० टक्के भाजल्याचे आढळून आले. त्यामुळे तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी शाहरुखला अटक केली. पण त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चात्ताप. उलट तो हसत होता. त्याच्यासह नईमला ही शिक्षा सुनावण्यात आली. अटकेनंतर दोघांनाही दीड वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि आता त्यांना दोषी घोषित करण्यात आले आहे. त्याच्या शिक्षेचा पुढील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.