'मिर्झापूर' ते फॅमेली मॅन; प्राईम व्हिडीओने केली आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा

    20-Mar-2024
Total Views |
‘मिर्झापुर’ ते ‘पंचायत’ जाणून घ्या अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या सीरीज आणि चित्रपटांबद्दल…
 

amazon prime 
 
मुंबई : चित्रपटगृहांपेक्षा घरबसल्या किंवा कुठेही प्रवास करताना मोबाईलवर चित्रपट किंवा वेब सीरीज पाहण्याला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे. प्रेक्षकांच्या सोयीनुसार त्यांचे मनोरंज करण्याचा ध्यास हाती घेतलेल्या अनेक ओटीटी (Mirzapur Season 3) वाहिन्यांनी त्यांच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरीजची घोषणा केली आहे. नुकतीच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या नव्या चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा केली असून यात बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर’ (Mirzapur Season 3) ते ‘फॅमेली मॅन’ या वेब सीरीजचा समावेश आहे.
 
जाणून घेऊयात अॅमेझॉन प्राईमच्या नव्या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल -
 
ऐ वतन मेरे वतन
बी हॅप्पी
सिटाडेल: हनी बनी
गँग्स कुरुथी पुनाल
सुपरमॅन ऑफ मालेगांव
दिल दोस्ती डिलेम्मा
अंधेरा
ख़ौफ़
इंस्पेक्टर ऋषी
स्नेक अँड लॅडर्स
छोरी २
कॉल मी बे
द मेहता बॉइज
द ट्रइब
दुपहिया
जिद्दी गर्ल्स
इत ट्रान्सीट
बँडवाले
वॅक गर्ल्स
मिर्झापूर सीझन ३
पाताल लोक सीझन २
पंचायत सीझन ३
सुझल -२
फॅमेली मॅन सीझन ३
बंदिश बँडिट्स सीजन २
फॉलो करलो यार
दज राना कनेक्शन
रंगीन
मटका किंग
दलदल
डॅरिंग पार्टनर्स
द ग्रेट इंडियन कोड
सुभेदार
थलवेट्टियां पलायम
फॉलआऊट
 
मिर्झापूर-३ चा फर्स्ट लूक आला समोर
 
'मिर्झापूर' या वेब सीरिजने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. दोन सीझनने मिळवलेल्या यशानंतर प्रेक्षक या सीरीजच्या तिसऱ्या भागाची वाट पाहात होते. आता ती उत्सुकता संपली असून लवकरच तिसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. या तिसऱ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम्म शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चढ्ढा, राजेश तैलंग, मनुषी चढ्ढा, ईशा तलवार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून यात खुर्चीला आग लागलेली दिसत आहे. "गुड्डू आणि गोलू यांनी सिंहासनावर हक्क दाखवल्यानंतर आता ते खुर्चीच्या आणखी एका दावेदाराविरुद्ध लढणार आहेत," असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे.