लोकपालांचा महुआ मोईत्रांना दणका!, 'आरोप खूप गंभीर आहेत....सीबीआयला निर्देश
20-Mar-2024
Total Views | 47
नवी दिल्ली : 'क्वॅश फॉर क्वेरी' प्रकरणात खासदारकी गमवावी लागलेल्या महुआ मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भारतीय लोकपालने तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात सीबीआय तपासाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्यावर दर्शन हिरानंदानी यांच्या व्यावसायिक हितासाठी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. तसेच, हे सर्व व्यावसायिक गौतम अदानी यांना नुकसान पोहोचविण्यासाठी करण्यात आले आहे. तसेच, लोकपाल म्हणाले, दर महिन्याला काय प्रगती केली, यासंदर्भात तपास अहवाल द्या. असे निर्देश सीबीआयला देण्यात आले आहेत.
दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली. आता लोकपालच्या आदेशानंतर त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार (पीसीए) गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. 'न्यायिक सदस्यांचा कोरम' न्यायमूर्ती अभिलाषा कुमारी, अर्चना रामसुंदरम आणि महेंद्रसिंग यांनी मान्य केले की आरोप केवळ गंभीरच नाहीत तर त्यासंदर्भात कारवाई ठोस पुरावे देखील आहेत.
लोकपाल यांनी याप्रकरणी बोलताना म्हटले की, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, जेणेकरून सत्य काय ते कळेल, असे सांगतानाच ते म्हणाले, ते आपले कर्तव्य आहे आणि कायदा असेही म्हणतो की भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी व्हावी याकरिता दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वकील आणि महुआ मोइत्राचे माजी भागीदार जय अनंत देहादराय यांच्या पत्राबाबत तक्रार दाखल केली होती.
महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप काय?
आरोप असा आहे की, महुआ मोइत्रा हिने लोकसभेच्या ऑनलाइन पोर्टल(खात्या)चा संपूर्ण ताबा मित्र उद्योगपती दर्शन हिरानंदानी यास दिला होता. विशेष म्हणजे या बदल्यात तिला महागड्या भेटवस्तू मिळत होत्या. महुआ मोइत्रा यांनी दिल्लीतील तिच्या अधिकृत निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी व्यावसायिकाकडून पैसेही घेतले होते. दर्शन हिरानंदानी यांच्या व्यावसायिक हितासाठी त्यांनी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप असून हे सर्व विशेषतः गौतम अदानींना नुकसान पोहोचवण्यासाठी करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून भेटवस्तूंच्या बदल्यात लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर लोकसभेच्या आचार समितीने महुआंची खासदारकी रद्द केली होती.