निक-प्रियांका पोहोचले अयोध्येत, लेक मालतीसह घेतले रामललाचे दर्शन

    20-Mar-2024
Total Views | 37
लेक मालती आणि नवऱ्यासह प्रियांका चोप्रा अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी पोहोचली आहे.
 

priyanka 
 
अयोध्या : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नायिका प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या अमेरिकेहून भारतात आली आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी नुकतीच तिने हजेरी देखील लावली होती. यानंतर ती थेट अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) लेक मालती आणि नवरा निक जोनस सोबत गेली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात जाऊन तिने (Priyanka Chopra) दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत मालती आणि निक दोघेही पारंपारिक पेहरावात दिसले.
 

priyanka pos ayodhya 
 
प्रियांका चोप्रा लग्नानंतर जरी भारतातून परदेशी स्थायिक झाली असली तरी ती आपल्या भारतीय संस्कृतींपासून दुर गेली नसल्याचे अनेकवेळा दिसून येते. ती बऱ्याचदा आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडणाऱ्या प्रत्येक रितीभाती मुलगी मालती हिला शिकवताना दिसते. आणि त्याचाच प्रत्यय रामललाच्या दर्शनावेळी आला. प्रियांका, निक आणि मालती तिघेही पारंपारित वेशात आले होते, शिवाय त्यांचे राम मंदिरात कपाळावर गंधी आणि गळ्यात उपरणं घालत स्वागत करण्यात आले.
 

priyanka post 
 
प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘सिटाडेल’चा पुढचा सीझन Amazon Prime Video वर लवकरच येणार आहे. शिवाय ‘द बल्फ’ हा तिचा हॉलिवूड चित्रपट देखील येणार आहे. तसेच, पुन्हा एकदा हिंदीत कमबॅक करण्यासाठी ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ सोबत झळकणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121