मुंबई: एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचा अहवाल सादर झाला आहे. मंगळवारी एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचे सीईओ केन वाट्रेट यांनी भारताच्या जीडीपी दराबाबत देखील भाष्य केले आहे. जगातील सरासरी जीडीपी दर (Gross Domestic Product) मध्ये २.३ वरून २.६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. विशेषतः युएस,युके,भारत या देशातील जीडीपीत मोठ्या प्रमाणात दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे केन वाट्रेट यांनी सांगितले आहे. विशेषतः भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्ष २०२४ मधील ६.५ % तुलनेत ६.८ % होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२३ या आर्थिक वर्षानंतर मार्केटमधील अनुमान अपेक्षेप्रमाणे केवळ २.४ % न राहता जीडीपीमध्ये दरवाढ होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार जागतिक जीडीपी दरात त्रिमासिक बेसिसवर (QoQ) आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २.६ टक्क्यांवर वाढण्याची शक्यता एस अँड पी ने व्यक्त केली आहे. यापुढे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केन वाट्रेट यांनी आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या टप्यात ०.८ % ने जीडीपी दर वाढण्याची शक्यता दर्शवली आहे.
जीडीपी दर वाढल्याचे मुख्य कारण घरगुती उत्पन्नात झालेली वाढ,घटलेली महागाई व सुधारित आर्थिक परिस्थिती या एकत्रित कारणांमुळे अर्थव्यवस्थेला चांगले संकेत एस अँड पी ग्लोबलने दिले आहेत. तसेच जेपी मॉर्गन ग्लोबल कंपोझिट इंडेक्स आधारे एस अँड पी ग्लोबल सर्व्हेत उभरत्या अर्थव्यवस्थेतील दरवाढ ही विकसित देशांच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. उत्पादन (Manufacturing) व कंपोझिट निर्देशांकात २०२२ मध्यानंतर पहिल्यांदा दरवाढ होण्याची शक्यता सांगितली आहे.
याशिवाय जागतिक ग्राहक महागाई दरात देखील या अहवालात भाष्य केले. ग्लोबल प्राइज कनज्यूमर इंडेक्स (जागतिक ग्राहक महागाई दर) आर्थिक वर्ष २०२३ तुलनेत यंदा ५.७ टक्क्याने घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्यात महागाई दरात ४.४ टक्क्यांवर घसरले आहे. अहवालानुसार युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.