मुंबई: आजच्या दिवशी अखेर तेलाच्या किमतीत घट झाली आहे. वधारलेल्या डॉलरच्या किंमतीने तुलनेत तेलाच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (क्रूड) मध्ये चार महिन्यांतील सर्वाधिक कपात झाली आहे. या आधीच्या सत्रात तेलाच्या दरात मोठी भाववाढ झाली होती.
पुरवठा घटून वाढलेल्या मागणीने ही भाववाढ झाली होती. परंतु अनेक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याने व तेलाची मागणी घटल्याने तेलाचे भाव नियंत्रणात आले आहेत. दुसरीकडे डॉलरही स्वस्त झाल्याने तेलाच्या किमंतीत एक प्रकारचे डिफ्लेशन (दर कपात) झाली आहे. ब्रेंट क्रुड फ्युचर या निर्देशांकात १६ सेटंने घट होत (०.२ टक्के) म्हणजे प्रति बॅरेल किंमत ८७.२२ डॉलर पोहोचली आहे.
युएस वेस्ट टेक्सास (WTI) निर्देशांक ०.४ टक्क्याने म्हणजेच ३१ सेटंने किंमत घटत प्रति बॅरेल किंमत ८३.१६ डॉलरपर्यंत सेटल झाली आहे.तज्ञांच्या मते नफा नोंदणीसाठी देखील गुंतवणूकदारांनी या संधीचा उपयोग करून घेतल्या असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे आशियाई बाजारातील निराशेचे मुख्य कारण युएस बाजारातील आकडेवारी जाहिर होण्याची शक्यता असल्याने अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी आशियाई बाजारातील गुंतवणूक मध्यंतरी मोठ्या प्रमाणात काढून घेतली होती. रुपयाची घसरण झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचत त्याचा मोठा फटका भारतीय गुंतवणूकदारांना बसला आहे. युएस डॉलर मात्र मोठ्या अंकाने वधारला गेल्याने आशियाई बाजारात नकारात्मकता दिसली.
डॉलरची किंमत वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. व्यापारी वर्ग मोठ्या आशेने फेडरल रिझर्व्ह आकडेवारीची वाट पाहत आहे.