केरळच्या सनाउल इस्लामला अफगाणिस्तानमध्ये अटक; तालिबान एजन्सीकडून चौकशी सुरु!

    02-Mar-2024
Total Views | 216
Sanaul Islam from Kerala arrested in Afghanistan

नवी दिल्ली
: अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेतील एका भारतीय व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव सनाउल इस्लाम असून तो केरळचा रहिवासी आहे. इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी तो अफगाणिस्तानला पोहोचला होता. त्यादरम्यान तालिबानने त्याला अटक केली. मात्र, भारतीय तपास यंत्रणांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. अफगाण तालिबानचा दावा आहे की सनाउल इस्लाम ताजिकिस्तान मार्गे अफगाणिस्तानची राजधानी कंदाहार येथे पोहोचला होता. अफगाण तालिबानचा आरोप आहे की सनाउलचे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. दहशतवादी कट रचण्याच्या उद्देशाने तो आपल्या सहकाऱ्यांची मदत घेण्यासाठी आला होता. याच हेतूने तो कंदाहारला पोहोचला.

सनाउल इस्लामकडून भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. त्या पासपोर्टवर सनाउल इस्लाम असे लिहिले आहे. त्याच वेळी, त्यांचे निवासस्थान केरळमधील मल्लपुरमचे उल्लट्टुपारा असे लिहिले आहे. प्राथमिक चौकशीनंतर सनाउल इस्लामला ताब्यात घेण्यात आल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.त्याचवेळी तालिबानने हे प्रकरण तपासासाठी गुप्तचर विभाग जनरल डायरेक्टरेट इंटेलिजन्सकडे सोपवले आहे. तालिबानची गुप्तचर शाखा या व्यक्तीची चौकशी करत आहे. तालिबान हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की तो कोणत्या ठिकाणी जाणार होता आणि तो आतापर्यंत कोणत्या लोकांना भेटला होता आणि तो कोणाला भेटणार होता. त्याला कंधार कारागृहात ठेवण्यात आले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की सनाउल इस्लामच्या अटकेबाबत पुढील पावले उचलण्याबाबत अफगाण एजन्सींशी चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. सनाउल इस्लाम हा दहशतवादी संघटना IS (इस्लामिक स्टेट) मध्ये सामील होण्याच्या उद्देशाने ताजिकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात गेल्याचे तपासात समोर आले आहे.अब्दुल रशीद अब्दुल्ला यांच्याशी या घटनेचे साम्य आहे. अब्दुल रशीद केरळमधील कासरगोड येथील २१ जणांसह याच भागात फिरला होता. दहशतवादी सहसा ताजिकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तपास पथकाने पुष्टी केल्यानुसार सनाउल इस्लामच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून येतो.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121