रा.स्व.संघाच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यास द. आफ्रिकेतून अटक!
एनआयएची कारवाई
02-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) पदाधिकारी रुद्रेश यांच्या हत्येचा आरोपी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी मोहम्मद गौज नियाझी यास दक्षिण आफ्रिकेतून अटक केली आहे.एनआयएने मोहम्मद गौसवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तो भारतातील प्रतिबंधित पीएफआयचा मोठा चेहरा होता. त्याच्यावर 2016 मध्ये बेंगळुरूमध्ये रा. स्व. संघाचे पदाधिकारी रुद्रेश यांची हत्या केल्याचाही आरोप आहे. बंगळुरूमध्ये रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यामध्ये रुद्रेश यांचा मृत्यू झाला होता.
रुद्रेश यांच्या पीएफआयचा दहशतवादी फरार झाला होता आणि वेगवेगळ्या देशात राहत होता. गुजरात एटीएसने प्रथम दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या स्थानाचा मागोवा घेतला आणि केंद्रीय एजन्सीला माहिती दिली. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत पकडला गेला असून त्यास सध्या मुंबईत आणण्यात आले आहे.