टाटा सन्स टीसीएसमधील ९००० कोटींचे शेअर विकणार

आयपीओ टाळण्यासाठी कंपनीचा धोरणात्मक निर्णय

    19-Mar-2024
Total Views |

Tata Sons
 
मुंबई: टाटा सन्सने TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) मधील आपले ९००० कोटींचे भागभांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्सने हे समभाग (शेअर) विक्रीचा धोरणात्मक निर्णय थकित देये (Debts) देण्यासाठी घेतला असल्याचे समजले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने आपल्या १५० अब्ज डॉलर मूल्यांकनात फेरबदल (Restructuring) करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमांच्या सुत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे आरबीआयच्या अप्पर लेयर मधील एनबीएफसी नियमांनुसार नोंदणी टाळण्यासाठी कंपनी आपल्या बॅलन्सशीटमध्ये नव्याने बदल करणार आहे.
 
याबद्दल सर्वप्रथम वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलेले होते. टाटा सन्स आर्थिक वर्ष २३ च्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, कंपनीवर २१९०९ कोटींची देणगी थकबाकी असून चलन व बँक बॅलन्स हा ४५१ कोटींच्या आसपास आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये टाटा सन्सचे नोंदणीकरण सीआयसी (Core Investment Company) अंतर्गत झाले होते. त्यामुळे टाटांच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत असणारी टाटा सन्स कंपनीने आयपीओ टाळण्यासाठी विविध पर्याय खुले ठेवले आहेत.
 
टाटा सन्सने टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपन्यांत १०० कोटींहून अधिक गुंतवणूक केलेली आहे. आरबीआयच्या अटीनुसार सीआयसी दर्जा मिळवण्यासाठी कंपनीला १०० कोटींहून अधिक गुंतवणूक करावी लागते. व तो निधी लोकांच्या गुंतवणूकींचा भाग असला पाहिजे.
 
आर्थिक वर्ष २३ प्रमाणे, टाटा सन्स मधील बुक व्हॅल्यूही १.३ लाख कोटींच्या घरात होती. त्यामुळे कंपनीने आपली देणी चुकती करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. असे झाल्यास टाटा समुहाला सीआयसी दर्जातून मुक्तता मिळत आयपीओ बाजारात आणणे टाळता येईल. टाटा समूह याआधीही आयपीओ बाजारात आणण्यासाठी टाळत आहे कारण या आधी टाटा कॅपिटलचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे.