दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे वेब सीरीज क्षेत्रात पदार्पण, 'मटका किंग' सीरीजची केली अधिकृत घोषणा
मुंबई : 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपट करत हिंदीत पाऊल टाकले होते. आता त्यांनी वेब सीरीजच्या नगरीत पदार्पण केले असून आगामी मटका किंग या वेब सीरीजची घोषणा केली आहे. 'मटका किंग' (Matka King) मध्ये अभिनेता विजय वर्मा प्रमुख भूमिका साकारणार असून मटका किंग (Matka King) रतन खत्रीच्या आयुष्यावर या वेबसीरीजचे कथानक आधारीत आहे.
नागराज मंजुळे यांनी आत्तापर्यंत मराठी सुपरहिट चित्रपट दिले. आता अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मच्या आगामी मटका किंग या सीरीजमध्ये ते एक अनोखी गोष्ट मांडणार आहेत. या वेब सीरीजमध्ये विजय वर्मा प्रमुख भूमिकेत आहे. तर या सीरीजची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे.नागराज मंजुळे सध्या 'खाशाबा' या मराठी चित्रपटात व्यस्त असून लवकरच या वेब सीरीजच्या शुटींगला ते सुरुवात करतील.