२२-१६-१०! मविआचं ठरलं? वंचितला किती जागा?

    17-Mar-2024
Total Views |

MVA


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याची बातमी पुढे आली आहे. शनिवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार उबाठा गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय उबाठा गटाकडील एक जागा राजू शेट्टी यांना देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे उबाठा गटाकडून लढणार असल्याचेही बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? -  "ज्यांच्याकडे शिवसैनिकच नाहीत ती शिवसेना कसली?"
 
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्यांचे जागांवर एकमत होताना दिसत नाही. दरम्यान, २२-१६-१० या फॉर्म्युल्यामध्येही वंचित बहुजन आघाडीचा समावेश दिसत नाही.
 
काँग्रेस नेते राहूल गांधी सध्या महाराष्ट्रात असून रविवारी मुंबईमध्ये त्यांची सभा होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यातच आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फार्म्युला पुढे आला असून २२-१६-१० असा हा फॉर्म्युला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.