राहुल गांधींसाठी पायघड्या घालताना राऊत बंधूंना ठाकरेंचा विसर!

    16-Mar-2024
Total Views |

Sanjay Raut Banner


मुंबई :
राहूल गांधी लवकरच मुंबईत दाखल होणार असून ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अशातच उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचे राहूल गांधींच्या स्वागताचे एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
राहूल गांधींच्या स्वागताच्या पोस्टरवर संजय राऊतांसोबत उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यापैकी एकाचाही फोटो दिसत नाही. या पोस्टरवर 'हमारे देश का नेता राहूल गांधी' असं लिहिण्यात आले असून राहूल गांधींसोबत केवळ संजय राऊतांचा फोटो झळकताना दिसत आहे. या फोटोवरून संजय राऊतांवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - राहूल गांधी मुंबईत दाखल! शिवाजी पार्कवर भव्य सभेचे आयोजन
 
याबद्दल बोलताना शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले की, "आम्हाला कुणी टक्कर देणार नाही, असे म्हणणारे संजय राऊत आपल्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा तर सोडाच पण उद्धव ठाकरेंचाही फोटो लावत नाही. कारण संजय राऊत उद्धव ठाकरेंना नेता मानतच नाहीत. त्यांचे नेते शरद पवार आणि राहूल गांधी हेच आहेत. या अशा लोकांमुळेच आम्ही उठाव केला आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.राहूल गांधी मुंबईत दाखल! शिवाजी पार्कवर भव्य सभेचे आयोजन


शनिवारी दुपारी राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल होणार असून सायंकाळी चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर रविवारी शिवाजी पार्कवर राहूल गांधींची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, त्याआधी राहूल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहे. यातच आता संजय राऊतांचे एक बॅनर चर्चेत आले आहे.