IPO News : पहिल्या दिवशी के पी ग्रीनला भरभरून प्रतिसाद १.७६ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले

शेअरचा प्राईज बँड प्रति शेअर १३७ ते १४४ रूपये

    16-Mar-2024
Total Views |
 
ipo
 
मुंबई: के पी ग्रीन कंपनीच्या आयपीओतील पहिल्या दिवशी भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी १.७५ ने ओवर सबस्क्राईब झाला आहे. सुरतस्थित असलेली एस एम इ कंपनी के पी ग्रीन कंपनीचा आयपीओ १५ मार्च ते १९ मार्च या कालावधीत ठरवण्यात आला होता.आयपीओ (IPO) आधी अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) कडून ५४ कोटी रूपयांची गुंतवणूक कंपनीला मिळाली होती. कंपनीचा प्राईज बँड (Price Band) हा १३७ ते १४४ रूपये प्रति समभाग इतका ठेवण्यात आला आहे.
 
बोफा सिक्युरिटीज युरोप एस ए हे अँकर गुंतवणूकदारापैकी सर्वाधिक गुंतवणूकदार असून या कंपनीने ५.९९ कोटींचे समभाग ( शेअर) विकत घेतले आहे. याशिवाय NAV Capital VCC व LC Radiance या कंपन्यांकडून के पी ग्रीनला प्रत्येकी ४ कोटींची गुंतवणूक मिळाली आहे.
 
१.३१ कोटी इक्विटी समभागाचे पब्लिक इश्यू कंपनी करणार असून कंपनीला यातून १८९.५० कोटींची गुंतवणूक मिळणे शक्य होणार आहे. सबस्क्रिप्शनमधील डेटा नुसार क्वालिफाईड इन्स्टीट्यूशनल इन्व्हेसटर ( QIP's) कडून ६०.८३ कोटींची बिडिंग कंपनीला आजपर्यंत प्राप्त झाली आहे. एकूण रिटेल विभागात १.९७ वेळा ओव्हर सबस्क्रिप्शनसाठी बीड मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
 
या आयपीओला १००० समभागांच्या गठ्ठ्यात हे समभाग खरेदी करता येईल. आयपीओनंतर २० मार्चला या समभागाचे वितरण करण्यात येणार आहे व २२ मार्चला या कंपनीचे समभाग बाजारात नोंदणीकृत ( लिस्टेड) होणार आहेत.