लोकसभेचं बिगुल वाजलं, निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर
16-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ पार पडणार आहे. याची सुरूवात दि. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याने होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, राज्यात ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. २० मे रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसचे, राज्यात ४ ते ५ टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच, नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व ज्ञानेश कुमार यांच्याकडून या पत्रकार परिषदेत निवडणूकांची घोषणा करण्यात येईल.
पुढील टप्प्यात लोकसभा निवडणूक २०२४ होणार
१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान
( पहिल्या टप्प्यात २२ राज्यांत मतदान/ अरुणाचल प्रदेश, अंदमान व निकोबार बेट, आंध्र प्रदेश, चंदीगड, दमन, दादरा नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड))
२६ एप्रिल दुसऱ्या टप्प्यातील मतदान
(दुसऱ्या टप्प्यात ४ राज्यांत मतदान/ कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर )
७ मे ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान
(तिसऱ्या टप्प्यात २ राज्यांत मतदान/ छत्तीसगढ, आसाम)
१३ मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान
( चौथ्या टप्प्यात ३ राज्यांत मतदान/ ओडिशा, मध्य प्रदेश व झारखंड)
२० मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान
( पाचव्या टप्प्यात २ राज्यांत मतदान/ महाराष्ट्र, जम्मू व काश्मीर)
२५ मे ला सहाव्या टप्प्यातील मतदान
१ जून ला सातव्या टप्प्यातील मतदान
( सातव्या टप्प्यात ३ राज्यांत मतदान/ उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार )
तर ४ जूनला मतमोजणी
दरम्यान, एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणाले, दि. १६ जूनला विद्यमान १६व्या लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. ते म्हणाले, एक स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूका होतील, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १.८२ कोटी नवीन मतदार यंदा मतदान करणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
तसेच, देशात ९७ कोटींहून अधिक मतदार नोंदणीकृत आहेत. तसेच, दोन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. आयुक्त राजीव कुमार म्हणाले, आपण स्वतः ८०० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. या आधी ११ राज्यातील निवडणुका शांततेत पार पडल्याचेही ते यावेळी म्हणाले. महत्त्वाची बाब निवडणूक आयोगावरच्या केसेस कमी झाल्या आहेत. देशभरात ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम मशीन्स निवडणुकीसाठी तयार आहेत. तसेच, ४८ हजार तृतीयपंथीय मतदार मतदान करणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक असल्याचेही निवडणूक आयोगाने सांगितले.
तरुण मतदार फक्त मतदान करणार नाहीत तर ते अॅम्बेसेडरदेखील असतील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मतदारांचे उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता छताची सोयदेखील मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वच्छतागृहाची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.