नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. २० वर्षीय सुलेमानवर विनयभंगाचा आरोप आहे. सुलेमानने मुलीला त्याच्या खोलीत बंद केले होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडून तिला वाचवले. ही घटना दि. ९ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सुलेमानला अटक करून गजाआडल करण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी सांगितले की, सुलेमानचे कुटुंबीय त्यांना केस मागे घेण्यास सांगत आहेत.
हे प्रकरण गाझियाबाद जिल्ह्यातील कौशांबी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे ८ वर्षांची पीडित मुलगी तिच्या लहान भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहते. पीडितेचे वडील सांभाळत असलेल्या किराणा दुकानातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पीडितेच्या आईने दि. १० मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या शेजारी सलमान (सुलेमान) नावाचा तरुण भाड्याने राहतो, असे तक्रारीत म्हटले आहे. तो अनेक दिवसांपासून पीडितेचा विनयभंग करत होता. पीडितेने सुलेमानच्या कृत्याबद्दल तिच्या कुटुंबियांनाही सांगितले होते. मात्र, सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांचा यावर विश्वास बसला नाही.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुलेमानने पीडितेला त्याच्या खोलीत बंद केले. दरम्यान पीडितेच्या भावाने घडलेली घटना आईला सांगितली. पीडितेची आई सुलेमानच्या खोलीत पोहोचली तेव्हा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडल्यावर मुलगी रडत बाहेर आली. दरम्यान सुलेमानने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे मुलीने सांगितले. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करून सुलेमानवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुलेमानविरुद्ध आयपीसी कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ९m/१० अंतर्गत एफआयआर नोंदवला. दि. ११ मार्च गाझियाबाद पोलिसांनी आरोपी सुलेमानला अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अल्पवयीन मुलगी आणि दोन वेगवेगळ्या समुदायांशी संबंधित होते, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली. सध्या याप्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.दरम्यान याप्रकरणी मुलीच्या वडिलांशी पोलिसांच्या कारवाईवर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. सुलेमान हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील आहे. तो आनंद विहार बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाजवळ घड्याळे व मोबाईल ॲक्सेसरीज इत्यादी विकतो. मुलीच्या कुटुंबीयांचा असाही दावा आहे की सुलेमान अनेकदा दारूच्या नशेत होता.