"यशवंत व्हा! विजय आपलाच आहे!"

भाजपच्या दुसऱ्या यादीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

    14-Mar-2024
Total Views | 197

BJP


मुंबई :
बुधवारी भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील नेत्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. विजय आपलाच आहे. यशवंत व्हा, असे म्हणत त्यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर भाजपची यादी शेअर करत उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारताच्या ध्येयासाठी महाराष्ट्रातून निर्विवाद पाठबळ लाभेल, ही खात्री मला आहे," असे ते म्हणाले.
 
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील २० नावांची यादी जाहीर केली आहे. यापैकी चार नवे उमेदवार देण्यात आले आहेत. दरम्यान, यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.
 
 

अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121