'स्वराज'च्या पहिल्या सीझनचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते लाँच

    13-Mar-2024
Total Views | 41
देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अपरिचित नायकांची गोष्ट स्वराज या वेब मालिकेत झळकणार आहे.
 

swaraj 
 
मुंबई : केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Swaraj Season On Amazon Prime) यांच्या हस्ते स्वराज्य मालिकेच्या पहिल्या सीझनचे लोकार्पण संपन्न झाले. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘स्वराज’च्या (Swaraj Season On Amazon Prime) पहिल्या सीझनचे अनावरण मुंबईत करण्यात आले. देशातील अपरिचित नायकांची कथा या सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
 
भारताच्या समृद्ध इतिहासाचा अभिमान असल्याचे म्हणत अनुराग ठाकूर म्हणाले की, “जे कुणी आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाचा सन्मान करत नाही त्यांना कोणतेही भविष्य नाही. आपल्या देशाला आणखी बलवान करायचे असेल तर देशातील युवा पिढीसमोर काही आदर्श असायलाच हवेत. येत्या २५ वर्षात आपण आणखी वेगानं भारताला दिशात्मक वळण देण्याचा प्रयत्न कऱणार”, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, या सीरीजची निर्मिती करणाऱ्या प्रसार भारतीचे अनुराग ठाकूर यांनी विशेष कौतुक केले. आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रसार भारतीनं महत्वाचे योगदान दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे असल्याचे देखील ठाकूर यांनी म्हटले.
 
 
 
पुढे ठाकूर म्हणाले की, “भारतीय चित्रपटाने आता त्यांचे वेगळे स्थान जगाच्या पाठीवर तयार केले आहे. कंटेटच्या बाबत भारतीय चित्रपट अग्रस्थानी आहे. त्यामुळे भारतीय कंटेटला जगाच्या विविध देशांतून प्रचंड मागणी आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कंटेट हब झाला आहे, असेही ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121