पेटीएमला थर्ड पार्टी म्हणून दिलासा पण ….

पेटीएम पेमेंट बँकेची मुदत वाढवण्यास आरबीआयचा नकार

    13-Mar-2024
Total Views |

Paytm Payment Bank
मुंबई: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम थर्ड पार्टी ' ॲप्लिकेशन म्हणून मान्यता दिली आहे.पेटीएम ( Paytm) म्हणजे आधीचे One 97 Communications कंपनीला ही मान्यता मिळाल्याचे सुत्रांच्या हवाले रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.याशिवाय पेटीएम पेमेंट बँकेला (PPBL)ला आपले कामकाज बंद करण्याची मुदत १५ मार्च पर्यंत वाढवण्यास आरबीआयने नकार दिला आहे.
 
तसा प्रस्ताव पेटीएम बँकेपुढे संचालक मंडळाने ठेवला होता.परंतु ग्राहकांना गैरसोय होऊ नये यासाठी पेटीएम पेमेंट बँकेला पेमेंट कॉर्पोरेशने थर्ड पार्टी म्हणून मान्यता दिली आहे.रोजच्या देवाणघेवाणीसाठी या पेटीएमचा युपीआय व्यवहारासाठी वापर करता येऊ शकतो.
 
पेटीएम पेमेंट बँक या पेटीएम उपकंपनीला आरबीआयने १६ फेब्रुवारीची मुदत वाढवून १५ मार्च ही नवी मुदत कंपनीला दिली आहे. आता मात्र ती मुदत न वाढवल्याने कंपनीचा कारभार मुदतपूर्व उरकावा लागणार आहे. पेटीएम पेमेंट बँकेला केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने ही मोठी कारवाई केली होती. याबरोबरच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कंपनीने आपले अंतर्गत फेरबदल (Restructuring) करण्याचे ठरवले होते. त्यामुळे संचालक मंडळात मोठा बदल झाला आहे.