
मुंबई: सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and ProgrammeImplementation) किरकोळ महागाई (Retail Inflation) दर जाहीर केले आहेत.गुंतवणूकदारांना बहुप्रतिक्षित असलेल्या महागाई दरात दिलासा मिळण्याची चिन्हे सरकारी आकडेवारीत दिसून येत आहेत.जानेवारी महिन्याच्या ५.१० टक्क्यांवरून १ अंकाने घसरत किरकोळ महागाई दर फेब्रुवारीत ५.९ टक्क्याने घसरला आहे.
जरी अन्नातील महागाई दर ८.३ % वरून ८.६६%. आला असला तरी सरासरी महागाईत एक अंशाने घसरण झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत.धोरण तज्ञांच्या मते अन्नातील महागाई दरात वाढ झाली असली तरी महागाई दर २ ते ६ टक्के पातळीच्या आत संतुलित राहीला आहे.मध्यंतरी आरबीआयने सकारात्मक परिस्थिती पाहता मॉनेटरी (आर्थिक) धोरणातील रेपो रेट मध्ये कुठलाही बदल करणार नसल्याचे सांगितले होते. सलग सहाव्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारीत अन्नधान्यातील महागाई दर ८. ३ टक्क्यांवरुन ८.६६ टक्क्यांवर गेला आहे. मागील महिन्यात आरबीआयकडून महागाई दर आर्थिक वर्ष २३-२३ मधील पहिल्या तिमाहीत ५.४ टक्के राहील असा अंदाज वर्तविण्यात आला होता.भारतीय औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन ३.८ टक्क्यांवर सिमीत राहिले आहे जे मागील डिसेंबर महिन्यात ४.२४ टक्क्यांचा आसपास राहिले होते. कनज्यूमर ड्युरेबल्स उत्पादनात मध्ये १०.९ टक्क्याने मोठी वाढ झाली आहे.भांडवली (कॅपिटल) वस्तू उत्पादन डिसेंबर २३ मधील ३.९ टक्क्यांच्या तुलनेत ४.१ टक्क्याने वाढल आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने(Ministry of Statistics and Programme Implementation) केलेल्या निरिक्षणातून ८ कंपनीच्या इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन (IIP) मध्ये जानेवारी महिन्यात घट झाली आहे. या व्यतिरिक्त इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या उत्पादनात ११.९ टक्क्याने घट झाली आहे.