आयपीओ अपडेट - गोपाल स्नॅक्स आयपीओचे बिडींग आज समाप्त

१०.७८ कोटींचे इक्विटी समभाग गुंतवणूकदारांनी खरेदी केले

    11-Mar-2024
Total Views |

Gopal Snacks
 
मुंबई: एफएमसीजी कंपनी गोपाल स्नॅक्सचा आयपीओचा आज शेवट झाला आहे. मार्च ६ ते मार्च ११ या काळात समभाग (शेअर) हे बिडींगसाठी उपलब्ध होते.अखेरच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळत नऊ वेळा यांचे सबस्क्रिप्शन पूर्ण झाल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.
 
६५० कोटी रूपयांच्या आयपीओला (Initial Public Offer) १.१९ समभागांच्या ऑफर बदल्यात १०.७८ कोटींचे इक्विटी समभाग गुंतवणूकदारांनी खरेदी केले आहेत.
 
घाऊक किरकोळ गुंतवणूकदारांनी (Retail Investors) ने ३.९७ वेळा ही बिडींग (Bidding) खरेदी करत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ६.८२ वेळा बिडींग (बोली) खरेदी केली आहे.
 
कंपनीच्या समभागांच्या प्राईज बँड (Price Band) हा ३८१ ते ४०१ रुपये प्रति शेअर इतका ठरवण्यात आला होता. गोपाल स्नॅक्सचा समभागांची खरेदी विक्री १४ मार्चपासून बाजारात खुली होणार आहे.