ठाकरेंना मोठा धक्का!, 'हा' नेता शिंदे गटात प्रवेश करणार

    10-Mar-2024
Total Views | 177
Uddhav thackeray Group
 

मुंबई :  उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. रवींद्र वायकर आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा जबर धक्का बसला आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंची मविआतील घटक पक्षासोबत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा विचार केला आहे. आज रात्रीच वायकर हे शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे.
 
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची गैरव्यवहाराप्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू असून वायकर कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच, गेल्या
 
वायकर यांची अलीकडेच ईडीने सखोल चौकशी केली होती. जोगेश्वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याबद्दल वायकर यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या विरोधातही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, आ. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जात असत. तसेच, वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. याआधीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे व वायकर कुटुंबीयांवर रायगड जिल्ह्यात बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात आरोप केला होता. जोगेश्वरीमध्ये राखीव भूखंडावर वायकर यांनी आधी क्लब व नंतर हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते. या प्रकरणात वायकर यांनी पैशांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121