भारतीय अर्थव्यवस्थेच्या तिमाहीत ७.८ टक्क्यांवरून विकासदर ८.२ टक्क्याने वाढल्याचे प्रतिबिंब आज शेअर बाजारात आढळून आले. सकारात्मक भावनांचा रोख ठेवत बाजारात गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याखेरीज निफ्टी नेक्स्ट ५०, ५१५.४० अंशाने वाढत ५०५०६.७५ पातळीवर पोहोचला आहे. बँक मिडकॅप १.११ टक्क्याने वाढत १३८९८.१० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी स्मॉलकॅप मध्येही वाढ झाली आहे. स्मॉलकॅप ०.३८ टक्क्याने वाढत ७३७९.८० पातळीवर पोहोचला आहे.
क्षेत्रीय निर्देशांकात देखील समाधानकारक वाढ झालेली आहे. आयटी, मिडिया, फार्मा वगळता जवळपास एफएससीजी,बँक ऑटो,मेटल, फार्मा या सगळय क्षेत्रातील निर्देशांकात वाढ झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकात (सेक्टोरल इंडायसेस) मध्ये सर्वाधिक वाढ निफ्टी मेटल निर्देशांकात झाली. मेटल निफ्टी ३.६२ टक्क्याने वाढत थेट ८२०८.५० पातळीवर पोहोचला व त्याखालोखाल बँक निफ्टीत झाली असून बँक निर्देशांक २.५३ टक्क्याने वाढला आहे. मागील ५२ आठवड्यातील बँक निफ्टी कमाल ३८६३६.४६ एवढा राहिला व न्यूनतम ३८६३.१५ पातळीवर पोहोचला होता. पीएसयु समभाग निर्देशांकात देखील २.१८ टकयाने वाढत ७०८०.७५ पातळीवर पोहोचला आहे.
सर्वाधिक नुकसान मिडिया समभाग निर्देशांकात झाला असुन मिडिया समभाग १.४७ टक्क्याने घसरत २०१९.९० पातळीवर पोहोचले आहेत. निफ्टी कनज्यूमर ड्युरेबल्स १.७१ ने वाढत ३२५९३.५० पातळीवर व तेल गॅस निर्देशांक २.२५ टक्क्याने वाढत ११७१५.४० पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय फायनान्सशियल सेवा निर्देशांक (इंडेक्स) हा ४३४.८० अंशाने वाढत २०८४२.७० पातळीवर पोहोचले आहे.
दिवसभरात सर्वाधिक निफ्टी निर्देशांकाची पातळी २२३५३.३० पातळीवर पोहोचला होता व सर्वांत कमी २२०४७.७५ पातळीवर गेला. एकूण व्यवहारांपैकी ३७ कंपन्यांचे समभागाचे मूल्य वधारले असून १३ कंपन्यांचे समभाग समभाग धारकांनी नाकारले आहे. आज युएस डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाची किंमत ८२.८६ रूपये प्रती डॉर इतकी होती. एनएससीवर एकूण कंपन्यांचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ३८८.९३ लाख कोटी रुपये इतके राहिले आहे. एनएससी संकेतस्थळावरील माहितीनुसार, निफ्टीत सर्वाधिक फायदा टाटा स्टील, जे एस डब्लू स्टील, इंडसइंड बँक, टायटन या सहभागाला झाला व दुसरीकडे डॉ रेड्डी, इनफी, एचसीएलटेक, सनफार्मा, ब्रिटानिया या समभागाचे मूल्य घसरले आहे. एनएससी संकेतस्थळावरील माहितीनुसार, २६८६ कंपन्यांच्या सहभागाचे ट्रेडिंग झाले असताना सहभागाचे अप्पर सर्किट १३९ व लोवर सर्किट ५२ पातळीवर पोहोचले.
सेन्सेक्स आज सत्राच्या अखेरीस ७३७४५.३५ पातळीवर पोहोचून एक नवीन विक्रमी नोंद बाजारात तयार झाली आहे. क्लोजिंग बेलनंतर १.७२ टक्क्याने बाजार वाढत तब्बल १२४५.०५ अंशाने वाढले आहे. बीएससी बँक निर्देशांक १२९८.६८ अंकाने वाढत ५३७५५.२६ पातळीवर पोहोचला आहे. आज बीएससीत टाटा स्टील ,आयसीआयसीआय बँक, लार्सन ट्युब्रो,टाटा मोटर्स हे समभाग तेजीत राहिले आहेत. याशिवाय टेकमहिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी या निर्दशांकात मात्र घसरण पहावयास मिळत आहे.
युएस फेडरल रिझर्व्ह रेट कटच्या गुंतवणूकदारांच्या भाकीतानंतर अमेरिकेतील बाजारात निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. तंत्रज्ञान समभागात मोठी वाढ झाली असुन NASDAQ बाजारात एस अँड पी ५०० ने नवा विक्रम प्रस्थापित केला.
जागतिक पातळीवर ए एफ पी रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, आशियाई समभागात युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपातीच्या संभाव्यतेने सकारात्मकता बाजारात दिसली. आशियाई व्यापारात जपानचा निकेयी निर्देशांक १.९० टक्क्याने वाढला, शांघाय ०.३९ टक्के व हांगसेंग ०.४७ टक्क्याने वाढला आहे.
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीबाबत विश्लेषण करताना मुंबई तरूण भारतला बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 1 मार्च रोजी, निफ्टी २२१०० पातळीवर पोहोचल्याने भारतीय बाजार सकारात्मक उघडले. सेन्सेक्स ३९१.४५ अंकांनी म्हणजेच (०.५४ टक्क्याने)वर पोहोचून 72,891.75 पातळीवर पोहोचला तर निफ्टी १३५.०० अंकांनी किंवा ०.६१ टक्क्यांनी वाढून ,२२११७.८० वर पोहोचला. सुमारे 1929 शेअर्सपैकी 455 घसरले, आणि 82 स्थिर राहिले. निफ्टीला टाटा स्टील, हिंदाल्को, बीपीसीएल, बजाज ऑटो, आणि यांतून मोठा फायदा झाला. हिरो मोटोकॉर्प, तर अपोलो हॉस्पिटल्स, इन्फोसिस, सन फार्मा, नेस्ले इंडिया आणि सिप्ला या समभागात मात्र तोटा सहन करावा लागला. निफ्टी ऑटो इंडेक्स १ मार्च रोजी दुपारी १.७% वाढून २०७४४ पातळीवर पोहोचला,फेब्रुवारीच्या विक्रीच्या आकडेवारीच्या पुढे ऑटो सेक्टरने मजबूत ऑटो विक्री संख्या नोंदवली असून M_M ने फेब्रुवारी 2024 मध्ये ७२९२३ युनिट्सची विक्री नोंदवली आहे, गेल्या वर्षी महिना तुलनेत २४% विक्री जास्त आहे. त्याचप्रमाणे, बजाज ऑटोने फेब्रुवारी 2024 मध्ये 3.46 लाख युनिट्सची नोंद केली, मागीलवर्षी याच महिन्यातील तुलनेत २३.६% विक्री जास्त आहे.
सरकारने विकादर ७.६ % च्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा ८.४ % ची मजबूत GDP संख्या नोंदवली. कडून ही मोठी चढाओढ अंदाज जे बेसच्या री-रेटिंगमुळे देखील आहे. बिझनेस मीडिया आणि कल्पनेशी परिचित असलेल्या बँकरच्या मते, अदानी एनर्जी सोल्युशन्स ही भारतीय कंपनी युनायटेड स्टेट्समधील संस्थात्मक गुंतवणूकदारांशी $400 दशलक्ष ते $500 दशलक्ष बाँड खाजगी जारी करून निधी देण्याबाबत प्राथमिक चर्चा करत आहे. सर्व्होटेक पॉवर सिस्टमला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 1400 डीसी रॅपिड ईव्ही चार्जरची व (IOCL) आणि इतर EV चार्जरची OEM ऑर्डर मिळाली आहे. एकूण सौदा 111 कोटींचा असणार आहे ज्यामध्ये ६० KW व १२० KW चे दोन ईव्ही चार्जर असणार आहेत.
Bharat Highways InvIT IPO ला बिडिंगच्या शेवटच्या दिवशी 100 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. भारतीय बेंचमार्क निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले, 1 मार्च रोजी निफ्टीसह नवीन उच्चांक गाठून २२३०० पातळी पार करत आहे. सेन्सेक्स १२४५.०५ अंकांनी किंवा १.७२ टक्क्यांनी वाढून ७३७५५.३५ पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ३५६.०० पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये टाटा स्टील, एल अँड टी, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन कंपनी आणि इंडसइंड बँक यांचा समावेश होता. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सन फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचा सर्वाधिक तोटा झाला.'
बाजारातील स्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना, जीओजीत फायनान्सशियल सर्विसेसचे विनोद नायर म्हणाले, अपेक्षेपेक्षा चांगला Q3FY24 GDP आणि यूएस चलनवाढीतील सहजता यामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत वाढ झाली आहे. जसजशी सार्वत्रिक निवडणूक जवळ येत आहे, तसतशी तार्किक आर्थिक विकास डेटाने निवडणूकपूर्व रॅलीसाठी गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास वाढवला आहे. जागतिक आघाडीवर, इन-लाइन यूएस वैयक्तिक वापर खर्च डेटा आणि सौम्य युरो झोन चलनवाढ जागतिक मध्यवर्ती बँकांना व्याजदरांबद्दल एक दृष्टिकोन घेण्यास प्रभावित करेल."
आजच्या शेअर बाजारावर मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले,' शुक्रवारी बाजाराने जोरदार वाढ केली आणि विक्रमी उच्चांक गाठला. सुरुवातीच्या चढ-उतारानंतर, निफ्टी जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा तो मजबुतीकडे गेला आणि शेवटी दिवसाच्या उच्चांकावर २२३३८.७५ वर बंद झाला; १.६% ने मेटल, बँकिंग आणि ऑटोने मजबूत नफा मिळविल्यामध्ये बहुतांश क्षेत्रांनी योगदान दिले. तथापि, विस्तृत निर्देशांकांनी बेंचमार्कपेक्षा कमी कामगिरी केली परंतु माफक नफ्यासह समाप्त करण्यात यशस्वी झाले.
आम्ही आता निफ्टीमध्ये 22,800 वर लक्ष ठेवत आहोत त्यामुळे सहभागींनी 21,900 पर्यंत ब्रेक होईपर्यंत "बाय ऑन डिप्स" दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आम्हांला वाटते की बँकिंग पॅकचा सहभाग प्रचलित गती राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील, तर इतर काही आवर्तक आधारावर सहाय्यक भूमिका बजावू शकतात. व्यापाऱ्यांनी स्टॉक-विशिष्ट दृष्टीकोन राखला पाहिजे आणि दीर्घ व्यवहारांसाठी इंडेक्स मेजर आणि लार्ज मिडकॅप काउंटरला प्राधान्य द्यावे.'