थोरवे-भुसे यांच्यात खरंच धक्काबुक्की?, काय आहे नेमकं प्रकरण

    01-Mar-2024
Total Views |
Dada bhuse assembly

मुंबई : 
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजचे कामकाज सुरू असताना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे व मंत्री दादा भुसे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. या धक्काबुक्कीच्या दरम्यान मंत्री दादा भुसे संतापले असल्याचेदेखील पाहायला मिळाले. दरम्यान, आ. महेंद्र थोरवेंनी आता दादा भुसेंवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, मतदारसंघातल्या कामाबद्दल मी त्यांना विचारले असता मंत्री भुसे यांनी आवाज चढविला. त्यामुळे आमच्यात बाचाबाची झाल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, आ. थोरवे व मंत्री भुसे यांच्यातील शाब्दिक चकमकीत मंत्री शंभूराज देसाई व आ. भरत गोगावले यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. आ. थोरवे यांनी म्हटल्याप्रमाणे, मंत्री दादा भुसे हे नकारात्मक मंत्री असून आम्ही आमच्या कामासाठी त्यांच्याकडे जात असतो. त्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही मंत्री थोरवे यावेळी म्हणाले.
 
मंत्री दादा भुसे व कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आता आ. महेंद्र थोरवे यांनी या सगळ्या प्रकारावर एका वृत्तवाहिनीला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. कर्जत मतदारसंघातल्या प्रस्तावित कामाबाबत विचारले असता दादा भुसेंनी आवाज चढविला. मग मी काय तुमच्या घरी खायला येत नाही, असे म्हटल्याचं थोरवे यांनी सांगितले. या सर्व प्रकारावर संतापून आ. थोरवे म्हणाले, आमदारांची कामे होत नसतील तर काय करणार असेही ते म्हणाले.