मुंबई: जगातील आयटी क्षेत्राचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे उद्योजक, समाजसेवक व मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह संस्थापक, बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशन सहसंस्थापक बिल गेट्स यांना किस ह्युमेनिटेरियन अवार्डस २०२३ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मानवी जीवनात बदल घडवून समाजसेवेतील त्यांचे बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. २८ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर ओडिसा येथे त्यांच्या वैश्विक आरोग्य, शिक्षण, हवामान बदल, तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम स्वरूप व्हर्चुअल स्वरूपात होता ज्यामध्ये किट (KIIT),किस (KISS) चे कर्मचारी व विद्यार्थी हेदेखील उपस्थित होते. विशेषतः लिंग समानता विषयावर आलेल्या प्रश्न उत्तर कार्यक्रमात बिल गेट्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत त्यांना समर्पक उत्तर दिली आहेत.
या पुरस्कारावर प्रतिक्रिया देताना, प्राध्यापक अच्युत समंता म्हणाले, 'बील गेट्स यांना किस मानवी पुरस्कार देणे हे केवळ त्यांचे उल्लेखनीय कार्याचा गौरव नसून बील गेट्स यांना हा पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांच्या या मानवीय योगदानाने जगातील या पुरस्काराची ओळख निश्चित झालेली आहे.बिल गेट्स यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.' अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.
संबोधितांना केलेल्या मार्गदर्शनात बिल गेट्स म्हणाले, 'या पुरस्कार दिल्याबद्दल मी प्राध्यापक डॉ समंता व किस संस्थेचे आभार मानतो. त्यांच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करताना मला आमंत्रित केल्या बद्दल आभार व्यक्त करतो. मला पुरस्कार देण्यात आला असला तरी सगळ्या टीमचे त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करतो.
'किस ह्युमेनिटेरियन अवार्डस' हा पुरस्कार प्राध्यापक अच्युत समंता यांनी सुरू केला होता. जगभरात मानवी मूल्य जपून मानवी कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा अत्युच्च सन्मानाचा हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात 'गोल्ड ट्रॉफी' दिली जाऊन त्यात एक समाज संदेश असणारी प्रत या पुरस्काराबरोबर दिली जाते. विश्वातील अडलेल्या व वंचित लोकांना मदतीचा आधार देत त्यांच्या आयुष्यात बदल करणारे व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. व्यक्ती किंवा व्यक्ती समुह, संस्था यांना हा प्रदान केला जातो.
या कार्यक्रमासाठी मिनिस्टर काऊन्सिलर ग्राहम मेयर, युएस ऐंबसी नवी दिल्ली फ्रँक तलुतो, हैद्राबाद राजकीय अधिकारी अनंत सुकेश, राजकीय सल्लागार युएस ऐंबसी नवी दिल्ली, हैद्राबाद युएस काऊन्सलेटचे राजकीय विशेष तज्ञ श्रीमली करी इत्यादी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.
काही उल्लेखनीय प्राप्तकर्त्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर-पश्चिम राज्याच्या माजी पंतप्रधान मॅडम एडना बोमो मोलेवा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, हॅनसेओ विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. हॅम-की-सन, दक्षिण कोरियाचे उत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ अनिरुद जुगनाथ, मॉरिशस प्रजासत्ताकचे अध्यक्ष, आर.टी. मा. लॉर्ड जस्टिस निकोलस एडिसन फिलिप्स, यूकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष, लियोनचेन जिग्मी थिनले, भूतानचे पंतप्रधान, मादाम अल्बिना डु बोईसरोव्रे, संस्थापक FXB इंटरनॅशनल, स्वित्झर्लंड, परमपूज्य दलाई लामा, आध्यात्मिक नेते आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते २००५, प्रो. युनूस, संस्थापक, ग्रामीण बँक, बांग्लादेश आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॅन्सा कौरौमा, केनिया प्रजासत्ताकच्या प्रथम महिला वगिनीच्या राष्ट्रीय संक्रमण परिषदेचे अध्यक्ष मामा रेचेल रुटो यांचा समावेश आहे.