७०३५२ कोटींचे नवे विलीनीकरण!
मुंबई: अखेरीस चर्चांच्या फैरीनंतर अखेरीस रिलायन्स व डिस्ने कंपन्यांचे भारतात विलीनीकरण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व डिस्ने यांच्यातील करार पूर्णत्वास येऊन भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी उदयाला आली आहे. नव्या माहितीनुसार, नीता अंबानी या नव्या आस्थापनेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कंपनीचे कामकाज आता रिलायन्स इंडस्ट्रीजचा हाती असून यात सर्वाधिक समभाग रिलायन्सचे असणार आहेत. टिव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हे सर्वात मोठे व्यासपीठ असून यामुळे ओटीटी स्पेस मध्ये तगडी स्पर्धेत उदयास येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी व्हायोकॉम १८ व स्टार इंडियाचे विलीनीकरण होणार आहे. रिलायन्स व डिस्ने, स्टार इंडियाचे विलीनीकरण होणार आहे. यांमध्ये एसआयपीएल करार होणार असून स्कीम ऑफ अरेंजमेंट मार्फत हा संबंधित व्यवहार होणार आहे.
या नवीन भागीदारीचे मूल्यांकन ७०३५२ कोटी रुपये असणार आहे. या कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स कडून ११५०० कोटींची निधी उभारणी केली जाईल. यामध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे १६.३४ %, व्हायोकॉम १८ कडे ४६.८२ %, डिस्नेकडे ३६.८४ % समभाग असल्याचे सांगितले जात आहे. नीता अंबानी या चेअरमन असताना वॉल्ट डिस्नेचे उदयशंकर हे उपाध्यक्ष असतील. रिलायन्स व्यक्तीरिक्त स्टार इंडियाचे २८००० कोटी व व्हायोकॉम १८ चे ३२००० कोटीचा भागभांडवल असणार आहे.
प्रेस मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार, टेलिव्हिजन, करमणूक, डिजिटल स्ट्रिमिंग व्यवसायात सर्वाधिक मोठी म्हणून कंपनीचे महत्वाचे लक्ष आहे. भारत व आंतरराष्ट्रीय पातळीवर ७५० दशलक्षाहून अधिक प्रेक्षक जोडण्याचे कंपनीचे सध्या लक्ष्य आहे. कलर्स, स्टार प्लस, हॉटस्टार अशा लोकप्रिय ब्रँडसोबतच ग्राहकांची गरज लक्षात घेता विविध कंटेंट आम्ही त्यांच्यासाठी आणू असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
जागतिक पातळीवर मंदी असताना डिस्नेला आर्थिक फटका बसला होता. देशातील सर्वाधिक मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिस्ने हॉटस्टारचा सबस्क्राईबरमध्ये घट झाली होती. आयपीएल, एचबीओ सारख्या बीड हरल्यामुळे त्याचा फायदा जिओ सिनेमाला झाला होता. हॉटस्टारने यातून सावरण्यासाठी त्यानंतर विनामूल्य क्रिकेटचा पर्याय स्विकारला होता. नव्या विलीनीकरणामुळे डिस्नेचा ३०००० हून अधिक कंटेंट ओटीटी प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे. प्रेसनोटमध्ये म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञान, दर्जेदार कंटेट, उपयुक्तता, विशेषता या सगळ्यांचा एकत्रितपणे फायदा नवीन ऑफरिंगसाठी होणार आहे.
रिलायन्सचे सर्व्हेसर्वा, चेअरमन व कार्यकारी संचालक मुकेश अंबानी यांनी या नव्या कराराविषयी बोलताना, ' भारतीय मनोरंजन क्षेत्रातील हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले आहे.' आम्ही कायम डिस्नेचा सन्मान केला आहे. जगातील विख्यात मिडिया कंपनी म्हणून डिस्नेचे नाव असताना त्यांच्याशी नवीन करार करताना खूप आनंद होत आहे असेदेखील म्हटले आहे.
'भारत हे जगातील लोकप्रिय मार्केट आहे. भविष्यात कंपनीच्या दिर्घकालीन वाढीसाठी आम्ही या संधीसाठी इच्छुक व आशावादी आहोत. रिलायन्स कंपनीला भारतीय बाजारपेठेबद्दल चांगली कल्पना आहे त्यामुळे आम्ही एकत्र येत देशातील अग्रणी मिडिया कंपनी म्हणून अस्तित्वात येऊ. भारतातील मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ग्राहकांना चांगले व विस्तृत कंटेंट देण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत' असे डिस्नेचे संचालक बॉब आयगर यांनी कराराबाबत बोलताना म्हटले आहे.
आर्थिक वर्ष २४ च्या अखेरीस हे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. सगळ्या परवानग्या, भागधारकांची मंजूरी व इतर तरतूद पूर्णत्वास येण्यास २०२४ अखेरीस हे नवी आस्थापना पूर्णत्वास येईल.