'इम्रान बेग'ने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार; केस मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबावर दबाव!
29-Feb-2024
Total Views |
रायपूर : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इम्रान बेगने प्रथम एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला उत्तर प्रदेशात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारापूर्वी इम्रानने पीडितेला बेशुद्ध केले होते. पोलिसांनी एफआयआर नोंदवून इम्रानला अटक केली आहे. इम्रानचा मदतनीस मोठा भाऊ कामरान बेग यालाही अटक करण्यात आली आहे.
त्याचवेळी या प्रकरणात शाहरुख नावाच्या आणखी एका व्यक्तीने पीडितेच्या कुटुंबीयांवर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला आहे. कुटुंबीयांनी केस मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पीडिता दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी इम्रान बेगविरोधात गुन्हा दाखल केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिलासपूरच्या तोरवा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. इयत्ता ८वीत शिकणारी १३ वर्षीय पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह येथे राहते. त्याच्याच परिसरात एक मकबरा आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील राहणारा २१ वर्षीय इम्रान बेग काम करायचा. इम्रानने आधी तरुणीशी मैत्री केली आणि नंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, असे सांगण्यात येत आहे.
आरोपी इम्रान याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दि. ८ फेब्रुवारी रोजी तिला आपल्यासोबत नेले. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबीयांना खूप काळजी वाटली आणि त्यांनी पीडितेचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना समजले की, मकबऱ्यावर काम करणारा इम्रान ही मुलगी बेपत्ता होण्यामागे आहे. त्यांनी इम्रानविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी हिंदू संघटनांकडेही मदत मागितली आहे. सर्व बाजूंनी दबाव पाहून दि. १२ फेब्रुवारी रोजी इम्रानने पीडितेला उसलापूर रेल्वे स्थानकावर आणून सोडले. पोलिसांनी येथून मुलीला ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. चौकशीत पीडितेने सांगितले की, इम्रानने तिला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी पाजले.
तिने पुढे सांगितले की, जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात होती. येथे इम्रानचे वडिलोपार्जित घर आहे. इम्रानने पीडितेवर बलात्कार केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आणि पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी इम्रानसोबतच त्याचा भाऊ कामरान यालाही या प्रकरणात आरोपी बनवले आहे.
छत्तीसगड पोलिसांनी इम्रान आणि कामरानच्या शोधात हमीरपूर येथे छापा टाकला, मात्र ते दोघेही येथून बेपत्ता असल्याचे आढळून आले. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोन्ही भाऊ सतत आपली ठिकाणे बदलत होते. मात्र, दोघे हमीरपूरच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी दोघांना पकडून बिलासपूरला आणले.
दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, शाहरुख नावाची व्यक्ती केस मागे घेण्यासाठी सतत धमकावत आहे. शाहरुख हा इम्रान बेगचा सहकारी असल्याचे बोलले जात आहे. तो मुलीच्या घरी पोहोचला आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी धमकी संपूर्ण घराला दिली. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली आहे. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली आहे.