नवी दिल्ली : विद्यापीठ प्रवेश परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. या वेळापत्रकानुसार आता तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहेत. यानिर्णयामुळे विद्यार्थ्यांना तीन शिफ्टमध्ये परीक्षा देता येणार आहेत. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना आता तीन शिफ्टमध्ये परीक्षा देता येणार आहे.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) अंतर्गत होणारी कॉमन विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ पुढील महिन्यात होणार आहे. दि. ११ मार्च ते २८ मार्च दरम्यान सीबीटी मोडमध्ये म्हणजेच संगणकाधारित चाचणी भारत देश व देशांबाहेरील शहरांमध्ये आयोजित केली जाईल. यामुळे देशाबाहेरील विद्यार्थ्यांनादेखील ही प्रवेश परीक्षा देता येणार आहे.
तसेच, विद्यापीठ प्रवेश परीक्षा ४ लाख ६२ हजार ५८९ नोंदणीकृत उमेदवारांसाठी आयोजित केली जाईल. या सर्व नोंदणीकृत उमेदवारांना जवळपास १५७ विषयांवर परीक्षा देता येणार आहे. या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त चार चाचणी पेपर निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता.
विद्यापीठ प्रवेश परीक्षा शिफ्ट टायमिंग पुढीलप्रमाणे :-
राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी कडून प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. उमेदवारांना शिफ्ट टायमिंग असे असणार आहे. या संगणकाधारित चाचणीतील प्रत्येक शिफ्टची वेळ १०५ मिनिटे निश्चित करण्यात आली आहे.
पहिली शिफ्ट - सकाळी ९ ते १०:४५
दुसरी शिफ्ट - दुपारी १२:४५ ते ०२:३०
तिसरी शिफ्ट - सायंकाळी ०४:३० ते ०६:१५