पेटीएमच्या विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा, आज पेटीएम समभाग १.३४ % वधारले

कंपनीकडून पेटीएम पेमेंट बँकेच्या नवीन संचालक मंडळाची घोषणा

    27-Feb-2024
Total Views |

Vijay Shekhar Sharma
 
 
मुंबई: पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमच्या गैर कार्यकारी अध्यक्ष व वन ९७ कम्युनिकेशन संचलित पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य म्हणून आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. पेटीएम प्रकरणानंतर अखेर त्यांनी हा राजीनामा देत असल्याचे रेग्युलेटरी फायलिंगमध्ये कंपनीकडून सांगण्यात आले.
 
एक्सचेंज रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, वन ९७ कम्युनिकेशने केवळ स्वतंत्र व कार्यकारी संचालक हे संचालक मंडळावर कार्यरत राहून त्यांच्याकडून नॉमिनी सुविधा काढल्याचे म्हटले गेले आहे. पेटीएम पेमेंट बँकेने आपल्या संचालक मंडळात आमूलाग्र बदल करून यात सेंट्रल बँकेचे माजी चेअरमन श्रीनिवासन श्रीधर, निवृत्त आयएएस अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग, निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिबल यांचा समावेश केला आहे.
 
याबाबतीत लवकर पेटीएमकडून कार्यकारी संचालक अध्यक्षांची निवड होऊ शकते. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी पेटीएम पेमेंट बँकैकडून यासंबंधी प्रकिया सुरू झाली आहे. १५ मार्चपर्यंत पेटीएम पेमेंट बँकेची अंतिम मुदत असणार आहे. याआधीच शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आयटी, रिस्क व्यवस्थापन व केवायसी अटींचे उलंघन असे विविध ठपके ठेवत आरबीआयकडून पेटीएम पेमेंट बँकवर कारवाई करण्यात आली होती. शर्मा यांच्याकडे कंपनीचे ५१ टक्के भागभांडवल आहे. पेटीएमचा मुख्य धारेतील व्यवहारांबाबत आपली संलग्नता नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी हा राजीनामा दिला असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
 
भविष्यातील नियमन व कंप्लांयन्स यासंबंधी सुरळीत कामकाजासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन व आरबीआय फिनटेक कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर बैठकदेखील करणार आहेत. सरकारकडून फिनटेक कंपन्यांच्या केवायसी प्रकियाचे सुलभीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.
 
परंतु शर्मा यांच्या राजीनाम्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेक दिवसांपासून मागे पडलेले शेअर (समभागावर) आज सकारात्मक वाढ पहायला मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात पेटीएम समभाग १.३४ टक्क्यांनी वाढत ४३३.८५ रूपयावर पोहोचला आहे. गेल्या तीन - चार दिवसांत पेटीएमने क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवांसाठी दुसऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या सुविधेनंतर पेटीएम समभागात रिककव्हरीची चिन्हे दिसत आहेत. काल पेटीएम समभागात ३० टक्क्यांचा परतावा मिळणे सुरू झाले होते जो १५ फेब्रुवारीला ४२८ या न्यूनतम मूल्यावर समभाग पोहोचला होता.