शेअर बाजार झलक : अखेर बाजारात सकारात्मकता सेन्सेक्स ७३०९५.२२ निफ्टी २२१९८ वर

इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता

    27-Feb-2024
Total Views |

stock market
 
मोहित सोमण
 
मुंबई: काल आणि परवा समभागावर निराशा पत्करल्यानंतर आज अखेरच्या सत्रात शेअर बाजार वधारले आहेत. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता आढळली असून मुख्यतः लार्ज कॅप मिड कॅप निर्देशांकात वाढ झाल्याने आज गुंतवणूकीसाठी सुकाळ असल्याचे म्हणता येईल. अखेरच्या सत्रात निफ्टी ५०, हा ७६.३० अंशाने वाढत ७३०९५.२२ पातळीवर पोहोचला असून सेन्सेक्स ३०५.०८ अंशाने वाढत ७३०९५.२२ पातळीवर पोहोचला. बँक निफ्टी निर्देशांकात देखील समाधानकारक वाढ होत ११.२५ अंशाने बाजार वाढत (०.०२ टक्क्याने) ४६५८८.०५ पातळीवर येऊन थांबला आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पीएसयु बँक व मिडिया कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ आज खुंटली आहे. पीएसयु बँकेच्या व मिडिया समभागात आज घसरण पहायला होऊन रिअल्टी, ऑटो, आयटी समभागावर वाढ झाली. याशिवाय एनएससीवर पीएसयु बँक समभागात घसरण झाली. बीएससीवरील एफएमसीजी, बँक निर्देशांकात घसरण झाली आहे ‌व आयटी, मेटल, ऑटो समभागात मात्र वाढ झाली आहे.
 
एनएससीवर सर्वाधिक फायदा टाटा मोटर्स , टीसीएसला झाला असून टाटा मोटर्स समभाग २.७५ टक्क्याने वाढत ,९२६.७० अंशाने वाढला. टीसीएस समभागात २.५८ टक्के वाढ होऊन १०३.३५ अंशाने वाढला आहे. एनएससीवर टाटा मोटर्स व्यतिरिक्त इंडसइंड बँक, पॉवर ग्रीड, सन फार्मा या समभागात वाढ होऊन हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एसबीआय, डिव्हीज, एसबीआय या समभागात घट झाली आहे. बीएसीवर सर्वाधिक फायदा टाटा मोटर्स समभागाला झाला असून २.७८ टक्क्याने म्हणजेच ९६२.७५ अंशाने वाढला. टीसीएसमध्येही मोठी वाढ दिसून आली आहे. बीएसीवर टीसीएस १०२.७० अंशाने (२.५६ टक्क्याने) वधारला आहे. याशिवाय पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, सन फार्मा या समभागात वाढ होऊन बजाज फायनान्स, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, एक्सिस बँक, एनटीपीसी या समभागात घसरण झाली आहे.
 
एकंदर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएससी) वर सकाळच्या सत्रात निफ्टी २०५६४.८५ पातळीवर उघडला गेला व अखेरच्या सत्रात २०५२७.९५ पातळीवर बंद झाला. आजच्या बाजारात सर्वाधिक निफ्टी पातळी २०६३१.३० पातळीवर पोहोचली. निफ्टीवर १४ कंपन्यांचे समभाग नाकारले गेले व ६ कंपन्यांच्या समभागात मात्र भाव वधारले आहेत.काल वाढ झालेल्या निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये आज ४७.९० अंशाने घसरण होत ५९१५०.६५ पातळीवर पोहोचला आहे. काल प्रमाणेच निफ्टी फायनान्सशियल सेवा निर्देशांकातही घट कायम असून ६६.८० अंशांनी घसरत अखेरच्या २०५५२.९० पातळीवर पोहोचला आहे. बहुतांश निफ्टी सेक्टोरल निर्देशांक आज ' ग्रीन ' राहिले आहेत.
 
आज एनएससीवरील एकूण कंपन्यांचे बाजार भांडवलीकरण (मार्केट कॅपिटलायझेशन) ३८८.७० लाख करोड इतके राहिले आहे. एकूण ऑटो, कँपिटल गूडस, फार्मा, रिअल्टी या समभागात अंदाजे ०.५ ते १ टक्क्याने मूल्य घसरले आहे.
 
आज विशेष म्हणजे मॅरिको समभागांवर कंपनीने गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी देत समभागावर ६.५ रूपयांचा अंतरिम लाभांश घोषित केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या भावात प्रति बॅरेल दर वाढले असलेतरी घसरलेला युएस डॉलर व सकारात्मक बाजार वातावरणाचा लाभ होत भारतीय रूपया ' जैसे थै' राहिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र भावना कायम राहिल्या आहेत.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतशी बोलताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' बाजाराने आणखी एका सत्रासाठी अस्थिर व्यवहार केले आहेत आणि मिश्र संकेतांमध्ये किरकोळ उच्चांक गाठला. सुरूवातीला 'जैसे थे' सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी शेवटपर्यंत एका श्रेणीत फिरला आणि शेवटी 22,198.35 च्या आसपास स्थिरावला. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र ट्रेंडने व्यापाऱ्यांना वेठीस धरले, ज्यामध्ये रिॲल्टी, आयटी आणि ऑटो उच्च पातळीवर तर आर्थिक आणि ऊर्जा दबावाखाली व्यापार करत होते. निःशब्द कामगिरी व्यापक आघाडीवर चालू राहून दोन्ही जवळजवळ एकाच परिस्थितीत संपले आहेत.
 
अलीकडील किंमतीवरील हालचालीबाबत कृती दर्शविते की 'बूल' विक्रमी-उच्च स्तरावर त्यांची स्थिती मजबूत करत आहेत आणि काही नवीन ट्रिगर्सची वाट पाहत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जागतिक बाजारपेठेतील, विशेषत: यूएस बाजारपेठेतील तेजी उत्साहवर्धक आहे, परंतु नवीन गती वाढवण्यासाठी आम्हाला हेवीवेट, विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये एक प्रकारचा ट्रिगर आवश्यक आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करून “बाय ऑन डिप्स’ पध्दत सुरू ठेवली पाहिजे.'
 
आजच्या बाजारातील हालचालीबाबत मुंबई तरूण भारतशी बोलताना, बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' बंद असताना, सेन्सेक्स ३०५.०९ अंकांनी किंवा ०.४२ % वाढून ७३०९५.२२ वर आणि निफ्टी ७६.३० अंकांनी किंवा ०.३४ टक्क्यांनी वाढून २२१९८.३० वर होता. निफ्टी रियल्टी आणि निफ्टी आयटी हे क्षेत्र होते जे आजच्या तुलनेत अनुक्रमे १.०७% आणि ०.७२ % ने वाढले. उघडण्याच्या अवघ्या काही तासांनंतर,आज Exicom Tele-Systems ची रु. 429-कोटी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) पूर्ण होऊन सदस्यत्व घेतले. EOD द्वारे Exicom ५.८ पटीने सदस्य झाले. उच्च नेट वर्थ व्यक्तींनी (HNIs) १०.४ पट सदस्यता घेतली आहे.
 
त्यांच्या वाटप केलेल्या समभागांच्या कोट्यापैकी, नियमित गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेला अंश १८ वेळा सबस्क्राइब झाला. ईव्ही चार्जरसाठी गुरुग्राममधील निर्मात्याची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO), पात्र संस्थात्मक खरेदीदार ७५% राखीव होते, तर गैर-संस्थागत गुंतवणूकदारांना १५ %आणि किरकोळ गुंतवणूकदारांना उर्वरित १०% प्राप्त होतील. विक्रीसाठी ऑफर (OFS) ७०.४२ लाख टॉप प्राईस बँडवर १०० कोटी रुपयांचे शेअर्स आणि ३२९ कोटी रुपयांच्या शेअर्सचे नवीन जारी करण्यात आले आहे. हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एसबीआय, डिव्हिस लॅब्स आणि यूपीएल हे निफ्टीच्या सर्वाधिक तोट्यात होते, तर टाटा मोटर्स, टीसीएस, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि सन फार्मा हे सर्वाधिक वाढले आहेत.'