शेअर बाजार झलक: सेन्सेक्स निफ्टी घसरला , सेन्सेक्स ७२७९०.१३ व निफ्टी २२१२२ पातळीवर

आयटी, मेटल समभागात सर्वाधिक नुकसान

    26-Feb-2024
Total Views | 37

stock market
 
मोहित सोमण
 
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळीही पडझड कायम राहून अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली. आज दिवसभरात अनेक समभागांच्या निर्देशांकात मोठी चढाओढ पहायला मिळाली आहे. काल तज्ञांच्या संमिश्र मतानुसार आज सकाळी बाजारात नकारात्मकता कायम होती. अखेरच्या सत्रात अखेरीस निफ्टी ९०.७० टक्क्याने घसरत २२१२२ पातळीवर पोहोचला आहे व सेन्सेक्स ३५२.६७ अंशाने घसरत ७२७९०.१३ पातळीवर पोहोचला आहे. बीएसी मिडकॅप निर्देशांकात देखील ०.४ टक्क्याने घसरण झाली. सेन्सेक्स साधारण ' जैसे थे' राहिला आहे. सकाळी बँक निफ्टीची घसरण झाली असताना अखेरीस मात्र ४९३ अंशांनी निर्देशांकात सुधारणा झाली आहे.
 
आज एनर्जी, ऑटो समभाग तेजीत असलेतरी इतर क्षेत्रातील समभागात (शेअर्समध्ये) 'लाल' निर्देशांक कायम राहिला आहे. विशेषतः आयटी, मेटल समभागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. निफ्टी ऑटो समभाग हा २०६४२.४० अंशाने ( ०.१०%) वाढत २०६४२.२० पातळीवर पोहोचला. निफ्टी फायनान्सशियल सेवा निर्देशांकातही ५७.४० अंशाने घसरत २०१६९.७० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक मात्र २२१२२ पातळीवर येऊनही निफ्टी नेक्स्ट निर्देशक ४४.८० अंशाने वाढत ५९१९८.५५ पातळीवर पोहोचला आहे. सर्वाधिक नुकसान मेटल समभागातही झाले असून तब्बल ७६.०० अंशाने समभाग घटत ७९७१.७५ पातळीवर पोहोचला आहे. एफएमसीजी, बँक या समभागातही तुलनेने गुंतवणूकदारानी नुकसान सहन केले आहे.
 
बीएसीमध्ये ग्लोबल निर्देशांकात घट कायम राहिली आहे. एफएमसीजी, ऑट, मेटल, बँक व आयटी क्षेत्रातील समभागात पडझड कायम राहिली आहे.
 
आज निफ्टीवर लार्सन ट्युब्रो,पॉवर ग्रीड, अदानी एंटरप्राईज, बीपीसीएल, टाटा कनज्यूमर या शेअर्समध्ये तेजी राहिली असून एशियन पेटंस, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को,डिवीज, टाटा स्टील या समभागात घसरण कायम राहिली आहे. बीएसीत अखेरीस लार्सन ट्युब्रो, पॉवर ग्रीड, हिंदाल्को, युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, नेसले इंडिया या समभागात तेजी असून अखेरच्या सत्रात मात्र एशियन पेटंस, टाटा स्टील, टायटन कंपनी, टेक महिंद्रा, भारती एअरटेल या समभागात घट पहायला मिळाली आहे. सकाळी शेअर बाजार ९०.६४ अंशाने घसक्षत २२१२२.०५ पातळीवर खाली आला होता. आशियाई बाजारही आज नुकसान झालेले दिसले असून हाँगकाँग, शांघाय, कोसपी, निकेई शेअर बाजारात देखील निदर्शकांत घट झालेली आहे.
 
भारतीय रुपयात २ पैशाने वाढत युएस डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाची किंमत ८२.८९ रूपयावर गेली आहे. परदेशी चलनातील वाढ, घसरलेला डॉलर यांचा फायदा भारतीय रूपयावर झाला. लेखा वायरलेस, निराल नेटवर्क, इनस्टालसीटी सोल्युशन्सच्या बरोबर करार केल्यानंतर आरटीआय लिमिटेडच्या समभागात २.१४ टक्के वाढ होत बीएसीवर समभाग ३२१.५० रूपये प्रति समभागावर पोहोचला आहे.
 
जीपीओ हेल्थकेअरचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज अखेरचा दिवस असल्याने अखेरीस ४.५ टक्क्यांहून अधिक सबस्क्रिप्शन वाढून आयपीओला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. क्रूड निर्देशांकात देखील १६ अंशाने घसरण होत ६३३७.०० पातळीवर पोहोचले. एमसीएक्सवरही सोन्या चांदीच्या निर्देशांकात घट होऊन सोने १२५ अंशाने घटत ६२२२० पातळीवर पोहोचले व चांदीत ८२८ अंशाने घट होऊन ६९६५१ पातळीवर चांदी निर्देशांक पोहोचला आहे. याशिवाय तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील संभाव्य महागाईचा फटका आयटी समभागावर बसला आहे.
 
आजच्या एकूण बाजारातील हालचालीत निफ्टीत सर्वाधिक निर्दशांक २२२०२.१५ पातळीवर पोहोचला व एकूणच निफ्टीतील १२ समभागात तेजी दिसून ३७ कंपन्यांचे समभाग नाकारले गेले आहेत. सेन्सेक्सवर दिवसभरात सर्वाधिक निर्दशांकात ७३०९२.२६ पातळीवर पोहोचला व अखेरीस ७२७९०.१३ पातळीवर बंद झाला.
 
याविषयी मुंबई तरूण भारतशी बोलतांना, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले की, 'बाजाराने आठवड्याची सुरुवात कमकुवत नोंदीवर केली आणि कोणत्याही मोठ्या ट्रिगरच्या अनुपस्थितीत जवळपास अर्धा टक्का गमावला. सुरुवातीपासूनच स्वर दबला होता आणि निवडक हेवीवेट्समधील घसरणीमुळे बहुतेक सत्रासाठी पूर्वाग्रह नकारात्मक राहिला. परिणामी, निफ्टी २२११५..०५ या पातळीवर स्थिरावला. ०.४ टक्क्याने कमी होऊन बहुसंख्य क्षेत्रांमध्येही दबावाखाली व्यापार झाला आहे. ज्यामध्ये आयटी आणि धातू सर्वाधिक तोट्यात होते. विस्तीर्ण निर्देशांकांनी देखील एक निःशब्द क्रिया पाहिली ज्यामध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही किरकोळ कमी झाले.बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांची कमी कामगिरी मुख्यत्वे भावनेवर तोलली जात आहे, तथापि अनुकूल जागतिक संकेत आणि इतर हेवीवेटमधील रोटेशनल खरेदी नुकसान कमी करत आहेत. या सर्वांमध्ये, निफ्टी निर्णायक पणे २१,९०० पातळी मोडेपर्यंत “बाय ऑन डिप्स” पध्दतीने पुढे चालू ठेवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करतो. तथापि, व्यापाऱ्यांनी मिश्र सहभागाचा हवाला देत स्टॉक निवडीत अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे आणि उच्च बीटा काउंटर टाळावेत.'
 
आज मुंबई तरूण भारतशी मार्केविषयक परिस्थितीवर बोलताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' निफ्टी आज नकारात्मक पातळीवर बंद झाला. ९०.६५ अंशांने निफ्टी घसरत २२१२२ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स ३५२ अंशाने घसरत ७२७९० पातळीवर पोहोचले व निफ्टी एनर्जी क्षेत्रात चांगली कामगिरी होत ०.५० अंशांने वाढला. पेटीएम पेमेंट बँक आपल्या क्षेत्रातील इतर संस्थेचा बँक, एनबीएफसी सेवांना पाठिंबा देत इतर व्यासपीठावर क्रेडिट कार्ड व वैयक्तिक कर्ज सेवा पुरवू शकतात. श्रीराम फायनान्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, पूनावाला फिन कॉर्प, एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड या कंपन्या पेटीएम एप्लिकेशन्ससाठी लिस्टेड आहेत. आज टॉप निफ्टी लूजर एशियन पेटंस, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल, डिवीज, टाटा स्टील राहिले आहेत. टॉप निफ्टी गेनर हे पॉवर ग्रीड, एल अँड टी, अदानी एंटरप्राईज, अदानी पोर्ट, टाटा कनज्यूमर या कंपन्या राहिल्या आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121