मुंबई : हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कॅनेडियन अभिनेता केनेश मिशेल याचे २४ फेब्रुवारी रोजी दुख:द निधन झाले. वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी या अभिनेत्याचा अंत एका दुर्धर आजारामुळे झाला. केनेथच्या निधनाची बातमी सोशल मिडियावरुन त्याच्या कुटुंबियांनी दिली.
केनेथच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत त्याला आदरांजली वाहिली. स्टार ट्रेक डिस्कव्हरी आणि मार्व्हलच्या कॅप्टन मार्व्हल सीरिजमध्ये केनेथची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, केनेथ हा गेल्या काही दिवसांपासून एएलएस सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होता. त्यावर त्याचे उपचार देखील सुरु होते. मात्र, अखेर त्याची या आजाराशी झुंज अपयशी ठरली.