केवळ तांत्रिक अडचणीचा कंपनीकडून उल्लेख
मुंबई: एज्युकेशन टेक कंपनी बारजू'ज वरील संकटात वाढ होत असताना मोठी घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. बायजू'जच्या काही भागधारकांनी बायजू रविंद्रन यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव सादर केला होता. सर्वसाधारण बैठकीत तातडीने हा प्रस्ताव मांडून बायजूज रविंद्रन यांच्यावर कंपनी चालवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा आरोप करत प्रस्ताव ठेवला.
अंमलबजावणी संचनालयाकडूनदेखील देश न सोडण्याचा अटीवर त्याला लूक - आऊट नोटीस बजावण्यात आली होती. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ९३६२.६५ कोटींचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. मात्र रविंद्रन कुटुंबाकडून हे सगळे दावे फेटाळले गेले होते. यातील मिळालेल्या नोटीसीतले दावे हे केवळ' तांत्रिक 'असून वार्षिक अहवालात विलंब झाल्याचा आरोप झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
'भागभांडवलधारकांकडून आर्थिक गैरनियोजन, अकार्यक्षमता या कारणांमुळे बैजूज यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हटविण्याची मागणी केली होती.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ६० टक्के भागभांडवल धारकांनी रविंद्रन यांच्या विरोधात अत्यावश्यक सर्वसाधारण मतदान केले आहे. परंतु रविंद्रन यांनी या वृत्ताचे खंडन करत केवळ १७० पैकी ३५ जणांनी म्हणजेच ४५ टक्के भागधारकांनी आपल्याविरोधात मतदान केल्याचा दावा केला होता. याशिवाय बैजूज रवींद्रन यांनी या निर्णयाविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली असून आपणच कंपनीचे पदाधिकारी म्हणून कायम राहिल्याचे आव्हान कंपनी कर्मचाऱ्यांना केले होते.
बायजू'जने दिलेल्या माहितीनुसार, ठरवलेली बैठक अनाधिकृत कसून कंपनी बैठकीत 'कोरम' कायद्याला धरुन नसल्याचे सांगितले आहे. यासाठी कर्नाटक न्यायालयात बायजूज यांनी धाव घेतली होती. एनसीलटीकडे 'प्रोसेस' या गुंतवणूकदारासहित अजून ३ गुंतवणूकदारांनी धाव घेतली असल्याने हा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
आम्ही हे ठामपणे सांगू इच्छितो की ईडी नोटिस दंडाची कोणतीही रक्कम निर्दिष्ट करत नाही परंतु एफडीआय/ओडीआय (९००० कोटी) ची मात्रा आणि या परिमाणासाठी संदर्भ कालावधीत आम्ही चुकलेल्या मुदतीसह हायलाइट करतो," असे निवेदनात कंपनीने पुढे म्हटले आहे
आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की बायजूज सर्व संबधित नियमांचे पूर्ण पालन करून पुढेही करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
याखेरीज अंमलबजावणी संचालनालयाने बायजू'जला परकीय चलन व्यवस्थापन कायदा (एफइएमए) अंतर्गत ९३६२.३५कोटी रुपयांच्या उल्लंघनासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे व फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (एफइएमए) १९९९ अंतर्गत निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणाने उपकलम (3) अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मेसर्स थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि बायजू रवींद्रन यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.