महाराष्ट्र : मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर मनोज जरांगेंना पुन्हा एकदा आदळाआपट करण्याचं कारण काय, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. दरम्यान, उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील संतप्त होत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांवर एकेरी उल्लेख करत अपशब्दाचा वापर जरांगेंकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाच्यावतीने आमची मागणी होती. त्यानुसार, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. परंतु, आता जरांगेंनी अशी आदळाआपट करण्याचं कारण काय, आणि त्यांचेच सहकारी त्यांच्याविरोधात आरोप करू लागले आहेत, असा आरोपदेखील छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना केला.