बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागपदत्र बनवण्यास मदत; मोहम्मद आणि इद्रिस NIA च्या जाळ्यात

    25-Feb-2024
Total Views |
 India Bangladesh
 
बंगळुरु : एनआयएने बंगळुरूमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या लोकांनी पद्धतशीरपणे घुसखोरांसाठी शहरात छावणी उभारली होती. या घुसखोरांनी बेंगळुरूच्या दोन वेगवेगळ्या भागात कचरा प्रक्रिया युनिट उभारले होते. अनेक महिन्यांपासून एनआयएची कारवाई सुरू होती. या टोळीने बांगलादेशींना भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश दिला आणि त्यांच्यासाठी आधारकार्डसारखी सर्व कागदपत्रे बनावट पद्धतीने बनवली, असे एनआयएने म्हटले आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार एनआयएने बांगलादेशींच्या मानवी तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद साजिद हलदर आणि इद्रिस अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही एनआयए ने गुरुवारी, दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी पकडले. एनआयएने आतापर्यंत या टोळीशी संबंधित १४ जणांना अटक केली आहे.
 
एनआयएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “हलदर आणि इद्रिस दोघेही बेनापोस मार्गे भारतात दाखल झाले होते. यातील हलदरने राममूर्ती नगर, बेंगळुरू येथे 'जंक कलेक्शन अँड सेपरेशन' युनिट स्थापन केले होते आणि या ठिकाणी बांगलादेशातून आणलेल्या घुसखोरांना कामावर ठेवले होते.
 
त्याच वेळी, इद्रिसने आनंदपुरा, बंगळुरू येथे असेच एक युनिट स्थापन केले होते आणि भाडेतत्त्वावर जमीन घेऊन घुसखोरांना राहण्यासाठी तंबू घर सुद्धा स्थापन केले होते. त्यात २० हून अधिक बांगलादेशी कुटुंबे ठेवण्यात आली होती. या कुटुंबांनाही तस्करीच्या माध्यमातून भारतात आणल्याचा संशय आहे, सध्या एनआयए या संपूर्ण नेटवर्कच्या थरांचा तपास करत आहे.