‘आर्टिकल ३७०’ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका साकरणारा कलाकार आहे मराठमोळा

    24-Feb-2024
Total Views | 54

kiran karmarkar 
 
मुंबई : आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा या चित्रपटाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू-काश्मिरमधूल ‘कलम ३७०’ हटवण्यात आले. या ‘कलम ३७०’ चा स्वातंत्र्यांनंतरचा संपुर्ण ७५ वर्षांचा इतिहास उत्तमरित्या या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेते किरण करमरकर दिसत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...
 
तर अभिनेते किरण करमरकर यांच्या अभिनयाची कारकिर्द रंगभूमी आणि जाहिरांतींमधून झाली. पण त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता अशी ओळख एकता कपूर दिग्दर्शित ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिकेपासून मिळाली. या मालिकेत त्यांनी ओम अग्रवाल ही भूमिका साकारली होती आणि त्यानंतर त्यांचे खरे नाव किरण आहे याचा लोकांना विसर पडून त्यांची ओळख ओम अशीच झाली. याशिवाय त्यांनी कलर्स हिंदी वाहिनीवरील ‘उत्तरन’ या मालिकेत खलनायकाची देखील भूमिका साकारली होती. किरण करमरकर यांनी मराठी आणि हिंदी नाटकांमध्ये देखील भूमिका साकारल्या. ‘मेरा नाम जोकर’ हे हिंदी विनोदी नाटक, तर चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बस इतनासा ख्वाब है’ या नाटकात देखील ते झळकले होते.
 
मराठी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ‘क्षणोक्षणी’, ‘आघात’, ‘आरोही : गोष्ट तिघांची’, ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘भातूकली’, ‘कान्हा’, ‘शासन’, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. आणि आता त्यांनी ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121