ज्येष्ठ स्वयंसेवक विलास पुरकर यांचे निधन

    24-Feb-2024
Total Views |

Vilas Purkar
(RSS Vilas Purkar)

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विलास पुरकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. एलआयसीमधून वरिष्ठ अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले होते. अनेक वर्ष त्यांनी रा. स्व. संघाचे नाशिक शहर सहकार्यवाह म्हणून काम पाहिले. विवेकानंद केंद्र (नाशिक)चे काम उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय प्रशिक्षण केंद्र (पिंपळद, ता. त्र्यंबकेश्वर) उभारण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. नाशिकमधील भोसला व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांमध्ये ते विविध पदांवर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.