इराणचा पाकिस्तानला दणका, घरात घुसून दहशतवाद्यांना केले ठार!

    24-Feb-2024
Total Views |
Iran forces kill Jaish al-Adl terrorists inside Pakistan territory

नवी दिल्ली
: शिया मुस्लिम राष्ट्र इराणने पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत इराणने जैश अल-अदलच्या कमांडरसह त्याच्या साथीदारांना ठार केले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी यासंबधित माहिती एका न्यूज पोर्टलद्वारे केली आहे. 'इराण इंटरनॅशनल इंग्लिश' असे या सरकारी माध्यमाचे नाव आहे. याआधी महिनाभरापुर्वी दोन्ही देशांनी एकमेंकाच्या भूमीवर हवाई हल्ले केले होते.

या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इराण आणि पाकिस्तानच्या सरकारनेही या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दहशतवादी कोणत्या भागात मारले गेले आणि मृतांची संख्या किती आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी जानेवारीमध्येही इराण आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला होता. दि.१६ जानेवारी २०२४ रोजी इराणने पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात मशीद उडवून टाकली होती.
या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैश-अल-अदलच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला केल्याचे इराणने म्हटले होते. मात्र, एका दिवसानंतर पाकिस्ताननेही इराणमध्ये हवाई हल्ला केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने याला बलुच बंडखोरांविरुद्धची कारवाई म्हटले होते. या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला होता.यामध्ये ४ महिला तर ३ मुले होती. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. यानंतर इराण आणि पाकिस्तानमध्ये राजनैतिक पातळीवरही वाद सुरू झाले. त्यांनी एकमेकांच्या देशातून राजदूतांना परत बोलावले होते. काही दिवस चाललेल्या वादविवादानंतर दोन्ही देशांनी राजदूताला परत पाठवण्याचे मान्य केले.

इराणने लक्ष्य केलेल्या जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेने इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत असल्याचा दावा केला आहे. हा सुन्नी इस्लामिक दहशतवादी गट आहे तर इराण शिया बहुसंख्य राष्ट्र आहे. २०१२ मध्ये तयार झालेला हा दहशतवादी गट इराणमध्ये वेळोवेळी हल्ले करत असतो. त्याचे लक्ष्य इराणमधील ती शहरे आहेत ज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे. येथील सुरक्षा दलांवर हल्ला करून ते पाकिस्तानात पळून जातात. पाकिस्तान आणि इराणमधील सीमा अनेक ठिकाणी ओलांडली आहे, त्यामुळे तस्करी आणि दहशतवाद्यांचा प्रसार सुरू आहे.