आनंदाची बातमी: सुकर प्रवासासाठी आरबीआयचा मोठा निर्णय आता प्रवास डिजिटल होणार

आरबीआयच्या प्रीपेड इन्स्ट्रुमेंटवरील मास्टर डायरेकशनमध्ये (मार्गदर्शक तत्व) मध्ये बदल

    24-Feb-2024
Total Views |

RBI
 
 
मुंबई: आता सार्वजानिक वाहनांनी प्रवास करण्याची चिंता आता दूर होणार आहे. कारणही तसेच खास आहे. केंद्र सरकारने आपल्या भविष्यातील प्रीपेड इन्स्ट्रुमेंटवरील मास्टर डायरेकशनमध्ये (मार्गदर्शक तत्व) बदल केलेला आहे. प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट( पीपीपी) वर अधिकृत बँक व विना बँकिंग संस्था या 'पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ' मधील चलन व्यवहार म्हणून नागरिकांना प्रदान करू शकतात.
 
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अनेक नागरिक विविध मार्गाने प्रवास करीत असतात. त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी हा निर्णय भविष्यात आरबीआयकडून घेतला जाईल.
 
आपल्या जाहीरनाम्यात आरबीआयने म्हटल्याप्रमाणे, ' सुलभता, परवडणारी किंमत, डिजिटल पेमेंट प्रणालीने सुरू होणारी ट्रान्सझिट सिस्टिमुळे ग्राहकांच्या सरलतेत भर पडणार आहे. यामाध्यमातून बँक व विना बँकिंग संस्था सामान्य नागरिकांना प्रवासासाठी पीपीपी उपलब्ध करून देऊ शकतील हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ताबडतोब होईल'.