मुंबई : 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ)' अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक व पात्र उमेदवारांना अॅप्रेंटिसशीपची मोठी संधी मिळणार आहे. या भरतीकरिता डीआरडीओच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेले सर्व तपशील जाणून घेऊन उमेदवारांने अर्ज करावयाचा आहे. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अर्ज पध्दतीबद्दलचे तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
पदवीधर अॅप्रेंटिस(१५ जागा)
ट्रेड अॅप्रेंटिस(१० जागा)
टेक्निशियन(६५ जागा)
शैक्षणिक पात्रता -
संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त.
आयटीआय अभ्याक्रम पूर्ण व प्रमाणपत्र.
वेतनमान -
पदवीधर अॅप्रेंटिस - ९ हजार रुपये.
ट्रेड अॅप्रेंटिस - ८ हजार रुपये.
टेक्निशियन - ७ हजार रुपये.
सदर भरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद-५०००५८.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०७ मार्च २०२४ असेल.
भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा