कोलकाता : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण बंगालने गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी संदेशखाली अत्याचार प्रकरणी रस्त्यावर मोर्चा काढला. त्यानंतर पश्चिम बंगालच्या राज्यपालांना निवेदन सादर करत संदेशखालीमध्ये न्याय आणि शांततेची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले.
अभाविपने राज्यपालांना दिलेल्या निवेदनपत्रातून काही मागण्या केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, 'महिलांवरील छळ आणि गैरवर्तनाचे प्रमुख आरोपी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संदेशखळीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी शेख शहाजहान व इतर आरोपींना तत्काळ अटक करावी, संदेशखालीच्या संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल तैनात करावे, संदेशखालीच्या घटनेची सीबीआय चौकशी सुरू करून सत्य उघडकीस आणावे.' संदेशखालीमध्ये शांतता आणि येथील लोकांचे हक्क राखण्यासाठी अभाविप वचनबद्धतेवर ठाम असल्याचे सावेळी सागण्यात आले.