मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दि. २३ फेब्रुवारी रोजी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.
दरम्यान, ओ. पी. गुप्ता यांची अप्पर मुख्य सचिव (वित्त), संजय सेठी अप्पर मुख्य सचिव परिवहन व बंदरे, राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव (महसूल), तर पराग जैन नैनोटिया यांची नियुक्ती प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग या पदावर करण्यात आली आहे.
कुणाला कुठली जबाबदारी?
१) कविता द्विवेदी - अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे
२) डॉ. हेमंत वसेकर - प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे
३) कौस्तुभ दिवेगावकर - आयुक्त, पशुसंवर्धन पुणे
४) कार्तिकी एन एस - मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे
५) मिलिंद शंभरकर - मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई
६) एम जे प्रदीप चंद्र - अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई
७) कावली मेघना - प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट
८) विजय सिंगल - उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई
९) संजय सेठी - अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे
१०) पराग जैन नैनोटिया - प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई
११) ओ पी गुप्ता - अप्पर मुख्य सचिव (वित्त)
१२) राजेश कुमार - अप्पर मुख्य सचिव (महसूल)