माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी!
22-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली: सीबीआयने दि.२२ फेब्रुवारी रोजी जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. दिल्लीसह मलिक यांच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील निवासस्थानीदेखील छापेमारी केली आहे.
किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळा गेल्या वर्षी मे महिन्यातही सीबीआयने १२ ठिकाणी छापे टाकले होते, त्यापैकी एक छापा सत्यपाल मलिक यांचा माजी सहकारी सौनक बाली यांच्या घरावरही टाकण्यात आला होता.जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय शोध मोहीम राबवत आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या कार्यकाळात किश्तवाडमधील जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित दोन फाइल्स निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे.