जीपीटी आयपीओ: जीपीटी हेल्थकेअरचा आयपीओ आजपासून बाजारात जाणून घ्या प्राईज बँड…

प्राईज बँड हा १७७ ते १८६ रूपये प्रति शेअर निश्चित

    22-Feb-2024
Total Views |

GPT IPO
 
 
मुंबई: आज कलकत्तास्थित मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल श्रुंखला असलेल्या जीपीटी हेल्थकेअरचा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असून या कंपनीने आरोग्य सेवेत विस्तारीकरण करण्याची योजना आखली आहे. लोकांसाठी आयपीओ वितरण हे आजपासून २५ फेब्रुवारी पर्यंत खुला असणार आहे. कंपनीकडून प्रति समभाग (शेअर) हा १७७ ते १८६ रूपये नक्की करण्यात आला आहे. अँकर (विशेष) गुंतवणूकदारांकडून याआधी मंगळवारी कंपनीने १५७.५४ कोटी रुपये जमा केले आहेत.
 
४० कोटी मूल्यांचे शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी खुले असतील. राहिलेले ४८५.१४ कोटी रुपये हे ऑफर फॉर सेल (ओएफएस) है ४८५.१४ कोटी रूपयांचे समभाग उपलब्ध असतील. रद्द केल्यास गुंतवणूकीचा परतावा २८ फेब्रुवारीला होणार आहे. बीएसी व एनएससीला २९ फेब्रुवारीला लिस्टेड (नोंदणीकृत) होणार आहे. कमीत कमी ८० समभागाची खरेदी गुंतवणूकदारांना करावी लागेल.
 
कंपनीकडून या गुंतवणूकीचा विनिमय ईशान्य भारतातील आरोग्य सेवेचे विस्तारीकरण, दैनंदिन कामकाज, भविष्यातील खर्चाची तरतूद यासाठी वापरला जाणार आहे. ५२५ कोटींचा हा आयपीओ असून यातील ४८५.१४ कोटी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतील.४० कोटी समभाग हे प्रथम वितरणातील असणार आहेत. प्रथमदर्शनी जीपीटी हेल्थकेअरचा ३२.६४ टक्के हिस्सा बनयान ट्री कंपनीने याआधी खरेदी केलेला आहे.
 
अँकर गुंतवणूकदारांमध्ये कोटक म्युच्युअल फंड, एक्सिस म्युच्युअल फंड, बंधन म्युच्युअल फंड,आदित्य बिर्ला लाईफ इन्शुरन्स व विविध गुंतवणूकदारांचा समावेश आहे.