आदित्‍य बिर्ला फॅशन आणि तरूण तहिलियानी यांच्या मुंबईमध्‍ये पाचव्या तस्‍वा स्‍टोअरचे उद्घाटन

मुंबईतील ऑबेरॉय मॉल येथे त्‍यांच्‍या ५व्‍या स्‍टोअरच्‍या लाँचची घोषणा

    22-Feb-2024
Total Views | 56

Aditya Birla Fashion
 
 
मुंबई : तस्‍वा हा आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि.चा भारतीय मेन्‍सवेअर ब्रॅण्‍ड आणि सुप्रसिद्ध डिझाइनर तरूण तहिलियानी यांना मुंबईतील ऑबेरॉय मॉल येथे त्‍यांच्‍या ५व्‍या स्‍टोअरच्‍या लाँचची घोषणा केली आहे. ऑबेरॉय मॉल, गोरेगाव येथे धोरणात्‍मरित्‍या स्थित नवीन स्‍टोअर शहरातील व आसपासच्‍या भागांमधील सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करेल, तसेच आपल्‍या नवीन पैलूसह डिझाइन करण्‍यात आलेल्या वेडिंग व प्रासंगिक पोशाखांची व्‍यापक श्रेणी प्रदान करेल.
 
 
तस्‍वाचे मुंबईतील पाचवे स्‍टोअर आहे, ज्‍यामधून ब्रॅण्‍डचा विकास आणि अद्वितीय फॅशन व जीवनशैली उत्‍पादने वितरित करण्‍याप्रती सातत्‍यपूर्ण कटिबद्धता दिसून येते. ब्रॅण्‍डचे नवीन स्‍टोअर १,७४६ चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि कुर्ते, बंदी, शेरवानी, बांधगला, आचकान, चुरीदार, अलिगढी आणि अॅक्‍सेसरीज जसे साफा, ब्रोचेस, पॉकेट स्क्वेअर, शाल, स्टोल, मोजरी यांची श्रेणी प्रदान करते. स्‍टोअरमधील उत्‍साहवर्धक वातावरण अनोख्‍या कलेक्‍शनला पूरक आहे.
 
 
प्रत्‍येक गारमेंटमधून तरूण तहिलियानी यांची सिग्‍नेचर स्‍टाइल दिसून येते, जे तस्‍वा आऊटफिट डिझाइन करण्‍यासाठी बारीक-सारीक गोष्‍टींवर लक्ष देत कुशलपणे तयार करण्‍यात आले आहे. तस्‍वा रेशीम, बनारसी ब्रोकेड, मखमली व कॉटन अशा कापडांचा वापर करते, ज्‍यामधून भारतीय टेक्‍सटाइल्सचा संपन्‍न वारसा साजरा केला जातो. पारंपारिक भरतकाम जसे जरदोजी, आरी, चिकनकारी आणि गोटा वर्कचा संपूर्ण कलेक्‍शनमध्‍ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये जागतिक भारतीयांसाठी भारतीय कारागिरीच्‍या आकर्षकतेसह समकालीन सिल्‍हूट्सचा समावेश आहे.
 
 
नवीन स्‍टोअरच्‍या उद्घाटनाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत तस्‍वाचे चीफ डिझाइन ऑफिसर तरूण तहिलियानी म्‍हणाले, '' तस्‍वा हे माझे दीर्घकालीन स्‍वप्‍न आहे, जे आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्‍या माध्‍यमातून शक्‍य झाले. नावामधून या ब्रॅण्‍डचे सर्वोत्तम व्‍हर्जन दिसून देते, जेथे आम्‍ही ब्रॅण्‍डला परिपूर्ण लुक देण्‍यासाठी अथक मेहनत घेतली आहे. दीर्घकाळापासून मी ऐकले आहे की, एथनिक वेअर कम्फर्टेबल नसतात आणि तस्‍वा या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी आमचा प्रयत्‍न आहे. आम्‍ही गारमेंट्स डिझाइन केले आहेत, जे आमच्‍या ग्राहकांना, इंडियन मॅनला आंतरराष्‍ट्रीय दर्जानुसार बनवण्‍यात आलेल्‍या आकर्षक आऊटफिट्सचा अनुभव देतात.''
 
 
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत तस्‍वाचे ब्रॅण्‍ड प्रमुख आशिष मुकुल म्‍हणाले, ''तस्‍वाने आपल्‍या दर्जात्‍मक उत्‍पादन ऑफरिंगसोबत प्रबळ ग्राहक कनेक्‍शन आणि मेन्‍स इंडियन वेअर ग्राहकांसाठी अद्वितीय स्‍टोअर अनुभवाची निर्मिती केली आहे. भारतीय खास क्षणांसाठी परिपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग आणि पुरूषांसाठी वेडिंग अॅपरल व अॅक्‍सेसरीजसह आमचा विश्‍वास आहे की, मुंबई सारखी प्रबळ बाजारपेठ आम्‍हाला या ब्रॅण्‍डला अधिकाधिक शॉपर्सपर्यंत घेऊन जाण्‍यास सक्षम करते.''
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121