घृष्णेश्वर-त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात
21-Feb-2024
Total Views |
(Tiger Raja Singh Mira Bharandar)
मुंबई : तेलंगणा भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते टायगर राजा सिंह महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी बुधवारी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. येत्या रविवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी मीरा-भाईंदर परिसरात होणाऱ्या त्यांच्या जाहीर सभेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे.
टायगर राजा सिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी मीरा-भाईंदर येथे सभेकरीता येणार होते. मात्र काही कारणास्तव सभेची तारीख २५ फेब्रुवारी केल्याचे स्वतः राजा सिंह यांनी समाजमाध्यमांतून सांगितले होते. सभेमागे भडकाऊ भाषण देण्याचा उद्देश नसून प्रत्येकामध्ये छत्रपती शिवरायांविषयी भावना जागृत व्हावी, हा त्यामागील मूळ उद्देश असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. परंतु मीरा रोड पोलीस ठाणे हद्दीतील सालासर सेंट्रल पार्क मैदान येथे सायंकाळी ५ दरम्यान होणाऱ्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी न मिळाल्याचे समोर येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे त्याचे म्हणणे आहे.