शेअर बाजार झलक: शेअर बाजारात घट मोठ्या ' बुल' नंतर आता विश्रांती

सकाळच्या सत्रातील तुलनेत बँक निफ्टी ३०० अंकाने कोसळला

    21-Feb-2024
Total Views |
 
stock market
 
 
मुंबई: आज सकाळच्या सत्रात निफ्टी सेन्सेक्स निर्देशकांत झेप पहायला मिळाली होती. परंतु अखेरच्या सत्रात (क्लोजिंग बेल) नंतर मात्र सेन्सेक्स ५०० अंशाने कोसळत ७२५०० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० हा २२००० पातळीवर पोहोचला. अखेरीस बीएसी सेन्सेक्स ४३४ पूर्णांकांने घटत ७२६२३.०९ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६७.८९ अंशाने घसरत ५३३७३.४८ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स ५० हा १५० अंशाने घटत २३११८.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसीमध्ये टाटा इन्व्हेसट, एबीबी, एस एल टेक या शेअर्सच्या (समभागात) वाढ झाली असून झी, एमआरपीएल, डिशटिव्ही या समभागात घसरण झाली आहे. ३.४४ वाजता निफ्टी निर्देशांक २२,०५५ पातळीवर आला होता‌. सर्वाधिक निफ्टी निर्देशांक आज २२२४९.८५ पातळीवर पोहोचला होता. एनएससीवर ११ समभागात प्रामुख्याने वाढ झाली असून ३७ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे.एनएससीवर टाटा स्टील, एसबीआयएन, इंडसइंड बँक, जेएसडब्लू, सनफार्मा या समभागाची चलती पहायला मिळाली परंतु बीपीसीएल, एनटीपीसी, कोल इंडिया, पॉवर ग्रीड, विप्रो या समभागात घसरण झाली आहे.
 
निफ्टी बँक निर्देशांक ७४.५० अंशाने घसरत ४७०१९.७० पातळीवर पोहोचला असून निफ्टी मिडकॅप ११७.१० अंशाने घसरत १०८६३.९५ पातळीवर स्मॉलकॅप ०.८९ अंशाने घसरत ७४४० पातळीवर पोहोचला आहे. सकाळप्रमाणेच निफ्टी मेटल, एफएमसीजी समभागात वाढ झाली असुन फार्मा, तेल व गॅस समभागात गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे. सकाळच्या सत्रातील तुलनेत दिवसभरात बँक निफ्टी ३०० अंकाने कोसळला आहे.
 
व्हर्लपूल इंडियाने केलेल्या सौद्यानंतर व्हर्लपूल समभाग २७.९० अंशाने घसरत १२५८ रूपये प्रति शेअर ( समभाग) वर पोहोचला आहे. विशेषतः ब्लु चीप कंपन्यांच्या समभागात व मिडकॅप समभागात वाढ अपेक्षित असूनही मात्र ते खाली घसरले आहेत. सोमवारी युएस शेअर बाजारात एनव्हीडीया चे समभाग सर्वात ' महत्वाचा ' शेअर बनला होता. परंतु तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या पुढील दिवसांत हा समभाग मात्र चांगली कामगिरी करु शकणार नाही असे मानले जात आहे.
 
तेलाच्या किमतींत वाढीबरोबर वैश्विक पातळीवर आयटी क्षेत्रात मंदी व एनव्हीडीयबद्दल केलेले भाकीत यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अखेरच्या सत्रात आज संभ्रमाचे वातावरण राहिले. सततच्या उसळी नंतर आज अखेरच्या सत्रात शेअर बाजाराने विश्रांती घेतली आहे